पहिला चहा : आशा आणि निराशा

चाहता : जोक काय करताय. भावनांची कदर करा.
पहिला चहा : आशा आणि निराशा
पहिला चहा : आशा आणि निराशा
Published on
Updated on

चाहता (ट्विटरवर) : वर्तमानपत्र, फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप सगळीकडे हसर्‍या आशाताई. देवा आणखी एक पर्व संपले. आठ दशकांची गाण तपस्विनी तेजोमय तारकापुंज होऊन आकाशी लोपली, पुन्हा कधीच सुरांच्या महिफिलीत सुन्या रिक्त जागी न परतण्यासाठी. अशा रिकाम्या जागांचे क्षेत्रफळ दिवसागणिक वाढत आहे. एकेक तारा निखळून पुन्हा आकाशी परतत आहे. यांचे जाणे जगण्याला परिपूर्ण व्याखेत गोवून जाणारे. भावपूर्ण श्रद्धांजली आशा ताई..!

कॉमेंट 1 : त्यांच्या जागेच्या क्षेत्रफळाचे वाटेकरी होणार की काय? जयप्रभा आठवले.

चाहता : नाही भाऊ. आम्ही इतके महान नाही. ते क्षेत्र आमचे नाही.

कॉमेंट 1 : मग ट्विटरचे क्षेत्रफळ मेसेजने का वाढवता? मान ना मान मैं तेरा मेहमान!

कॉमेंट 2 : तुमचं ट्विट वाचून बच्चनजी पागल झाले. माझ्यापेक्षा दर्दी दिसतोय कोणतरी ट्विट करणारा असं वाटलं असेल.

कॉमेंट 1 : ती राखी ‘बिग बॉस’मध्ये अडकली नाही, तर याला ट्विटरवर अंगाई गाऊन गार केला असता. सोपी मराठी अवघडते असं लिहिणार्‍यांमुळे. कळेल असं लिहा.

चाहता : मी आशाताईंचा फॅन आहे.

कॉमेंट 2 : आमच्याकडे उषाचा फॅन आहे.

चाहता : जोक काय करताय. भावनांची कदर करा.

कॉमेंट1: आम्ही कादर खान नाही हो डायलॉगबाजी करणारे. आम्ही आशाजी आणि उषाजींचेपण फॅन आहोत. कराओकेप्रेमी. आम्हीही गाणी गातो आशाताईंची!

चाहता : मग गा. इथे मध्ये नका येऊ.

कॉमेंट 1 : भाऊ उगीच कोणीही ट्विट करू लागलं, तर आम्हीही कसेही कॉमेंटू.

चाहता : मी कोण आहे माहिती आहे?

कॉमेंट 2 : जाऊ द्या ना? कशाला वाद घालता? मी एक संगीतकार आहे.

चाहता : त्या माझ्या शेजारी राहत होत्या.

कॉमेंट 2 : तरीच क्षेत्रफळ वगैरे बोलताय. कोणत्या क्षेत्रफळाची आणि क्षेत्राची रिकाम्या जागांची वगैरे बात करत आहात. मला तर तुम्ही झोलझालवाले वाटत आहात ट्विटवरून. सीबीआय चौकशी झाली पाहिजे.

चाहता : आधी तुमची चौकशी झाली पाहिजे. माझे ट्विट त्या आवडीने वाचायच्या आणि रिप्लायपण द्यायच्या. मी त्यांना सकाळी बाल्कनीत फिरताना नेहमी पाहायचो; पण आज त्या वर्तमानपत्रात दिसल्या. त्यामुळे मी चिंतित झालो. असो. प्रत्येकाची वेगळी कहाणी आणि एक सांगतो, मी पोलिस ऑफिसर आहे. अशा सायबर क्रायसिसवर अ‍ॅक्शन घेतो. बोला, सीबीआय बोलावणार की मी अ‍ॅक्शन घेऊ? रिकामटेकडे लेकाचे...!

(कॉमेंटस् डिलिट)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news