

बडा साब खुर्चीवरून उठताना पाय घसरून पडले. पुनः कसेबसे सावरले. बडा साब डॉन असले तरी आता डाऊन होते तब्येतीने. बाटलीतील भुताने नाही पाडलं. ते धुरंधर चित्रपट मन लावून पाहात होते. त्याचा परिणाम.
“इकबाल, जरा वो साऊंड ठीक करना. (होम थिएटरच्या आलिशान आराम खुर्चीत पुनः बसत) मैं ठीक से सून नहीं पा रहा...” बडा साबने खडसावले.
“बडा साब, आप बोल नहीं पा रहे ऐसा दिखाया उसमें. बंद करू क्या...”
“खुदा ना खास्ता... (खोकत) ये मेरे को ऐसा क्यूँ दिखाया गया है? मैं ॲक्शन लूंगा!”
“आप ने ही तो खबर फैलाई थी की आप की कबर खुद चुकी हैं, तो उन्होंने इतना ज्यादा तो नहीं दिखाया. कम से कम जिंदा तो दिखाया!”
“खामोश, मुझे वो गन दे दो. जा के थिएटर उडाता हुं.”
“वो लॉरेन्स ले के गया. अभी तक वापस नहीं आया!”
“लाव तू फिल्म लाव. मैं देखता हुं. और क्या क्या करवाया है मुझसे इन फिल्मी लोगो ने?”
“आपको रेस्ट करते हुये दिखाया है जो आपने कभी नहीं ली. बंद कर दु क्या?”
“अबे साले मूंह बंद रख. चला जा यहा से. मुझे देखना है मैं कैसा लगता हुं.”
“साब आप देख नहीं पाओगे. बेड रिडेन हैं उसमी आप.”
बडा साब ने ॲश ट्रे इकबालवर फेकला. त्याने बरोबर कॅच केला. अशा कितीतरी महागड्या वस्तू इकबालने एका खोलीत साठवून ठेवल्या होत्या. आता त्यांचा लिलाव करायचा ठरवला. बडा साब की खास चिजे जिससे गुस्सा पैदा होता है. फेंक के देखो. गुस्सा खुद ब खुद आता है. ही जाहिरात भाईखळ्यात आणि डोंगरीमध्ये गुपचूप अड्ड्यावर करण्यात आली. ही ट्रेनिंग घेणाऱ्या टोळीसाठी होती.
“इकबाल जरा आईना देना. कंबख्तो ने मेरा होलिया ही बदल दिया. साला मैं ऐसा दिखता हुं क्या?”
“नहीं बडे साब. मैं वही तो बात कर रहा है कबसे. आप डिपरेस्ड हो जायेंगे.”
“ओ, यही तो चाल है मेरे खिलाप. मैं ऐसे हात में आने वाला नहीं हुं. डॉन हुं मैं.”
आणि डॉन धुरंधर पाहून कोमात गेला. त्याचा कराची, पाकिस्तान आणि दुबईत, डोंगरीमध्ये कुठेच मागमूस अद्याप नाही. अजेय डोंगलनी अज्ञातवास घेतला. त्याला शोधण्यासाठी मिशन आखले. पण डॉन कोमात असल्याची खबर सगळीकडे पसरली. धुरंधरमुळे रणवीरला डॉनच्या धमक्या येऊ लागल्याने त्याने डॉन चित्रपट रिजेक्ट केला असावा. म्हणजे कोमात जाणारा डॉन खरा की खोटा ते अद्याप पडद्याआड आहे.