

सोनिया मॉम : (फोन वर) पप्पू कसा आहेस बेटा? फार पाण्यात खेळू नको. ताप येईल. गुळाचा चहा घे. साखरेचा नको.
पप्पू : गुळाचा चहा कोण पितात मॉम? मला ब्लॅक टी आवडतो. विदाऊट शुगर. आम्ही काँचो, आम्ही काँचो....! (गाणं गुणगुणत)
सोनिया : हे कोणते गाणे गात आहेस? नेपाळी का?
पप्पू : एस मॉम. मराठी फिल्ममध्ये नेपाळी साँग ऐकले. वेरी फनी.
सोनिया मॉम : ते फनी-बिनी राहूदे. उत्तराखंडात काय हाल हवाल?
पप्पू : भाषण खूप छान झालं. खूप गर्दी होती. लोक एकदम फिदा झाले भाषणावर.
सोनिया मॉम : माझं गुणी बाळ ते. छान छान. असा अभ्यास करूनच बोलत जा. उगीच विरोधकांत चर्चेला कारण होऊ नको दरवेळी. काय?
पप्पू : मॉम, दरवेळी तू मला समजायलाच हवं का? मी लहान नाही आता. पप्पू इज माय निक नेम. नॉट रिअल नेम.
सोनिया मॉम : ते निक नेम नाही. (हसत) वेड्या तुला त्या नावाने लोक चिडवतात; पण चिडू नको. हे तुझे पारितोषिक आहे.
पप्पू : व्हॉट नॉनसेन्स मॉम? पारितोषिक म्हणजे गिफ्ट? कसं काय?
सोनिया मॉम : तुझ्या बाबांना हे नाव खूप आवडायचं. आजीला पण. पण, मला नव्हतं आवडत बरं का?
पप्पू : मग, कोणी माझं नाव पहिल्यांदा ठेवलं असं पप्पू? विचित्र वाटतं ना?
सोनिया मॉम : विरोधी पार्टीने ठेवलं तुझं हे नाव. आणि आजी आणि बाबांना स्वर्गात इच्छा पूर्ण झाल्यासारखं वाटत असेल. म्हणून हे नाव गिफ्ट आहे, असं म्हटलं. खरेच ते दिवस सोनियाचे होते.
पप्पू : ओ वाव! मस्त. थॅन्क्स टू पॉप्स अँड ग्रँडमा फॉर धिस प्रेशिअस नेम!
सोनिया मॉम : मी काय म्हणते, ते ऐकूनच नाही घेतलास. टँकमधे जास्त उलट्या उड्या मारू नको. नीट स्विमिंग कर. इकडे नीट नाहीये काही. नीट पेपरफुटीवरून सारा राडा चालू आहे. तिकडे तू राडा घालू नको आणखी. बी सिरीयस! अधिक महिन्यातले अनारसे खायचे काय तुझ्या भाग्यात दिसत नाही अजून. तेच दुःख आहे आम्हाला आणि दीदीला. काळजी घे आणि नीट घरी ये.
पप्पू : येस मॉम. डोन्ट वरी! नीटचा निकाल लागेपर्यंत मी पोहोचतो. बाय. ठेवतो फोन. (फोन कट.)