पहिला चहा | शिंदेशाही आणि तानाशाही!

पहिला चहा | शिंदेशाही आणि तानाशाही!
पहिला चहा | शिंदेशाही आणि तानाशाही!
Published on
Updated on

अखेरचा हा तुला दंडवत.... उधमसाहेबांनी निर्वाणीत सांगून टाकले. तुम्ही ऑपरेशन यशस्वी केले. रुग्णांची काळजी घ्या, असेही बोलले थोडक्यात. सूर शांत, सेना शांत आणि आदीबाळ बाळसे न धरलेल्या दाढीवरून मांजरासारख्या नख्या ओढत मिमिक्री करत मीडियासमोर भाषण देण्यात गर्क; पण मिमिक्रीमुळे शिंदेशाही दाढीला त्यामुळे बळकटी आली. शाही रुबाब लांबलचक दाढीशिवाय पुरुषांना शोभा आणत नाही. तो वेगळाच असतो हे आदीबाळाला अजून समजण्याएवढी पोच नाही.

बाळ दुडुदुडु करत येतं आणि माईक पकडत, वाकुल्या दाखवत भाषणं करतं! बाबांना किती कौतुक बाळाचं. काही सांगू नका बाई. शिंदेशाही थाट माहिती असला, तरी पाहायचा अजून बाकी होता. म्हणून तर सहा शिलेदार गेलेही तिकडे. आता शिंदेशाही वस्तू शाही उत्सवात वर्ज्य करण्याचं फर्मान मातोश्रीवर निघालं.

शिव शिव शिव... पक्षप्रमुखांवर घोर संकट ओढवले. बाळ माईक हातातला सोडेना. बालिशपणा तळाशी बसल्याशिवाय आपल्या खास दरबारी प्रसंगी शोभा कशी येणार. निव्वळ डोळ्यांसमोर अंधार (अंधारे)! रावसाहेब अजून मातोश्रीवर बैठक आयोजित करण्यापाठीमागे लागलेत.

आमदारांना सावध करायला हवं; पण तेही थोडेचजण सावधान! बाकी विश्राम! ऑनलाईन सभेस हजेरी दिल्याची पुष्टी देत काहीजण हजेरी वजा रुजू झाले. रावसाहेबांची कॉलर ताठ राहण्यापुरते.

शाब्बास तेवढे तरी केले. पक्षप्रमुख पाठ थोपटत पुन्हा हुश्श! आता पुढे? तेवढेच काय ते! बाकी पुढे सेनेतली वाघ मंडळी काय हालचाल करतील त्यावर प्रतिक्रिया देण्यापुरते सक्रिय राहू एवढी खबरदारी माजी शिवसैनिक घेतील याची खात्री आहेच. अंधारे बाई समोर बसून रडून दाखवत मीडिया व्यापून टाकण्यात व्यस्त. पक्षात निष्क्रिय राहून कसे चालेल, म्हणून त्या शोक पसरवत पत्रकारांचा पसारा वाढवत होत्या.

आदीबाळ बाळबोधपणे सगळं न्याहाळत कुतूहलाने पाहत होता; पण आम्ही पक्के शिवसैनिक. ते दिवस पुन्हा आणू हा आविर्भाव नक्की होता म्हणायला हरकत नाही. त्याने काकूंना चांगलेच खडसावले, काकू बांगड्या छान आहेत; पण शिंदेशाही! त्या तरी लपवा. मग रडा. शिंदेशाही वर्ज्य आहे मातोश्रीवर आतापासून! समजलं?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news