पहिला चहा | भ्रमाचा भोपळा..!

पहिला चहा | भ्रमाचा भोपळा..!
पहिला चहा | भ्रमाचा भोपळा..!
Published on
Updated on

फेरीवाला : भाजी घ्या भाजी. ताजी ताजी भाजी. आजी, मावशी, काकू, भाजी घ्या. (येणाऱ्या-जाणाऱ्या स्त्रियांना)

शमा काकू : कशी आहे भाजी. हा भोपळा कसा दिला? (भोपळा हातात घेत)

फेरीवाला : त्याला नका हात लावू. फुटला तर घ्यावा लागेल. बाजूला व्हा.

शमा काकू : हे बरंय. आपणच बोलावता आणि भाजी नीट पारखून पण घेऊ देत नाहीत.

फेरीवाला : हे बघा बाजूला फळं पण आहेत. भोपळाच हवाय का?

शमा काकू : दर सांगा. मगच घेईन.

फेरीवाला : पन्नास रुपये पडतील. कमी करून देतो हवं तर.

शमा काकू : पंचेचाळीसला द्या. काय सांगावं! भ्रमाचा भोपळा असला तर?

फेरीवाला : तुम्ही नका घेऊ तो मग. दुसरी भाजी आहे इकडे. ती घ्या. मेथी आहे, वाल आहे.

शमा काकू : वाल वगैरे नको, भोपळाच हवाय. द्या तो.

फेरीवाला : हा घ्या. बाजूला शहाळे पण आहे, आताच आणले ताजे ताजे आहेत. देऊ का?

शमा काकू : आता शहाळे कशाला आणखी. बस झालं. द्या तो भोपळा इकडे. (तेवढ्यात शेजारच्या राधा काकू येतात.)

राधा काकू : अगं शमा, तू इकडे? भाजी बरी भेटली का? ओ फेरीवाले दादा, मला पाच फळं द्या.

फेरीवाला : घ्या, ती बघा तिकडे , चिकू, पेरू, काय हवं ते घ्या.

शमा काकू : फक्त फळं? भाजी नाही का घेणार? तू कशी काय बरं इतक्या सकाळी बाहेर पडलीस?

राधा काकू : मॉर्निंग वॉकला आमचे हे बाहेर पडले, फळं आणायला सांगायला विसरले, म्हणून मीच आले. यांना ज्यूस लागतो गं सकाळी आणि काय गं? भोपळा कशाला हवाय तुला?

शमा काकू : अगं, आमचं काल भांडण झालं, या भोपळ्यावरून. मला म्हटले भोपळा असता ना घरी तर तुझ्या लेकीकडे त्यात बसवून पाठवलं असतं, चार दिवस. म्हणून घेतला.

फेरीवाला : द्या तो भोपळा इकडे? पेट्रोल महाग झाले म्हणून पन्नास रुपयात तुम्हाला भोपळ्यातून पाठवणार का? दोन हजार रुपये पडतील या भोपळ्याचे. ठेवा तो. (फिरकी घेत, हसत)

राधा काकू : जोक आवडला हा? चल गं? भ्रमाचा भोपळा हवाय कशाला? भांडणं होतच असतात.

फेरीवाला : काकू-काकांना माझ्यातर्फे भेट द्या हा भोपळा आणि त्यांना पाठवा यातून लेकीकडे. हा हा.. (दोघीही हसत निघून जातात.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news