पहिला चहा | टांगा पलटी, घोडे फरार..!

पहिला चहा | टांगा पलटी, घोडे फरार..!
पहिला चहा | टांगा पलटी, घोडे फरार..!
Published on
Updated on

पावसाळ्याचे दिवस, श्रावण मास तोंडावर! बरीचशी खवय्ये मंडळी मोठमोठ्या हॉटेलात, खानावळी आणि मेसमध्ये वर्दी देत मटण-रश्‍श्‍यावर ताव मारायला जमली. हॉटेलचं नाव झुंड... मुंडेसाहेबांचा माणूस तपासणीसाठी झुंडमध्‍येे प्रवेशत..!

इसम : हुर्रे हो..! ऐ... बाबा आमचा नंबर कधी. तास झाला.

वेटर : साहेब, एक टेबल रिकामा होतोय. अजून दहाच मिनिट. मी बोलावतो.

इसम : अरे कॅप्टन, पोटात कावळे ओरडून गेले. किती वेळ हा.

वेटर : थोडा वेळ. तुम्ही असं करता का? एक कॉर्नर टेबल आहे; पण किचनजवळ असल्याने फोडणीच्या धुराचा त्रास होईल. बसता का तिथे?

इसम : (उठत) मग सांगशील ना. केले असते ॲडजस्ट.

वेटर : ओके. बसा तिकडे.

इसम : फुकट वेळ घालवला. काही हरकत नाही. घे ऑर्डर. एक चिकन विथ कॉक्रोच, मालवणी मच्छी विथ मक्खी आणि रोटी. बाकी नंतर ऑर्डर देतो. जा पटकन लावायला सांगा जेवण.

वेटर : ही कसली ऑर्डर (स्टाफला ओरडत) ऐ... कोपरा, टेबल लावा रे. (पुन्‍हा इसमाकडे) साहेब ऑर्डर देताय की मस्करी. नीट सांगा ना राव.

इसम : सांगतो. (टेबलापाशी जात, प्रचंड धूर आणि फोडणीचा ठसका, किचनमध्ये वाकून बघत, झुरळे, तांबेरा पडलेली पण वापरातली भांडी) हे काय अशाप्रकारे इथे जेवण बनवलं जातं?

वेटर : सर, जेवण पाहा, बाकी सगळीकडेच किचन असंच असतं हॉटेलात.

इसम : सावजी मटण खायला मुंडे येतील ना तेव्हा?

वेटर : कालच व्हिडीओ पाहिला. त्यांनी सावजी खायचं सोडले. आता काही ते फिरकणार नाहीत.

इसम : त्यांनी कोणाला तरी पाठवले तर?

वेटर : तसं होऊ शकतं. म्हणून तर कोपऱ्यातल्या टेबलाकडं आम्ही कुठल्याच गिऱ्हाईकाला जागा देत नाही. तुम्ही एकटेच दिसला त्यामुळे केली सोय टेबलाची.

इसम : मी मुंडेंचा माणूस आहे म्हटलं तर? शेर कभी झुंड मे नहीं आता. अकेला ही काफी है.

वेटर : मग कसे आलात. हॉटेलचं नाव झुंड आहे म्हणून म्हटलं. इसका मतलब आप शेर नहीं और मुंडे भी नहीं.

इसम : खामोश. ऑर्डर ऑर्डर. (मुंडेंची एन्ट्री)

मुंडे : आता सरळ कोर्टाची ऑर्डर. कुठे आहे रे ओनर?

(टांगा पलटी, घोडे फरार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news