पहिला चहा | निशाणीचा निशाणा

पहिला चहा | निशाणीचा निशाणा
पहिला चहा | निशाणीचा निशाणा
Published on
Updated on

बंधू : (मातोश्रीवरून फोन) कोणी धनुष्य देता का धनुष्य? कोठे गेला असेल? पाहिलास का तू आपल्याकडे होता म्हणे?

राज : साहेबांनी (बाळासाहेब) जाताना बरोबर नेला असे समजावे. धनुष्य होता तरी का? निशाणी म्हणा!

बंधू : काय चेष्टा करतोस ऊठ सूट. तू काही साहेबांचा उत्तरदायी वगैरे समजू नको. आम्ही आहोत साहेबांनंतर.

राज : मग धनुष्य आपल्यातून गेला त्याचेही उत्तरदायी आपणच आहात बंधुराया.

बंधू : ठीक आहे. आम्ही शोधू. तुम्ही तुमची शाब्दिक तोफ डागायची बंद करा. तोफेचे तोंड विरोध्यांकडे असू दे नेहमी. आपल्यात वाद नको.

राज : मला आणि तुलाही माहिती आहे धनुष्य कोठे आहे. जिकडे बाणाचे रोख होते तिकडेच धनुष्य पण फिरला. साहेबांनी शेवटी कोणावर निशाणा धरला होता?

बंधू : कोकणाच्या दिशेने?

राज : यही तो राज की बात है! तो धनुष्य आता एका टीळाधारीकडेच आहे. हे तुलाही माहिती आहे. ते सगळे एक आहेत.

बंधू : पण, ती फक्त निशाणी सांभाळतात. धनुर्धारी तर आम्ही आहोत वारशात.

राज : योग्य बोलले होते साहेब. धनुष्य पेलवणं सोपं नाही. अहो बंधुराया, निशाणीतूनच निशाणा साधला तुमच्यावर. खरे शिवधनुष्य तेच आहे. तू धनुष्य शोधण्याच्या नादात निशाणी हरवलास. तेच तर होते खरे धनुष्य.

बंधू : काय सांगतोस? साहेब निशाणीला धनुष्य संबोधत होते. आम्हाला वाटलं झेंडा नेतायत नेऊदेत.

राज : बाप रे! केवढं हे अज्ञान?

बंधू : आम्ही तर साहेबांची माळ पण लपवली होती.

राज : जाऊदे ते. तू चहा घ्यायला येतोस का पार्कमध्ये. मीही बाहेर पडलोय. फ्रेश होशील. झालं गेलं गंगेला मिळालं.

बंधू : अरे, असा कसा रे तू विरुद्ध वाहतोस अगदी प्रवाहाच्या? ते निशाण परत आणण्यासाठी मदत करशील ना?

राज : मी सुखी आहे. सुखात राहूदे. लोकल धावताना पाहिली की मन सुखावतं. तेवढं पुरेसं आहे. रिकामी का धावेना!

बंधू : आम्हाला पण लोकलने प्रवास करायचा आहे. भविष्यात तुझ्यासोबत, असा विचार करतोय आम्ही सध्या. चल, येतोय मी चहासाठी. ठरवू.

राज : अवश्य!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news