पहिला चहा | आदी लगीन कोंढाण्याचं...

पहिला चहा | आदी लगीन कोंढाण्याचं...
पहिला चहा | आदी लगीन कोंढाण्याचं...
Published on
Updated on

एका लग्नात सहा वाजंत्री पंगतीत जेवायला बसले. वऱ्हाडी मंडळी अक्षता टाकून भोजन उरकून निघून गेले. हे वाजंत्री भलतेच फेमस. जिकडे जाल तिकडे चांगभलंच आणि उदो उदो!

पहिला : वाह! झकास भोजन असणार. आता त्या 'श्रीं'च्या कोणत्याही समारंभात आपण वाजंत्री म्हणून जायचे नाही. हा शाही थाट बरा.

दुसरा : तिथे साधा पाटसुद्धा देत नव्हते बसायला.

तिसरा : हां नाही तर काय? बरं झालं, मी अजून काही तिकडे उणे दुणे नाही बोललो.

चौथा : तुम्ही कहर करूनच गप्प बसले. काही बोलू नका. इतकं हमरीतुमरीवर येतं का कोण? अहो, सोडून द्यायचं.

पाचवा : समारंभ तर सोडलाच ना. नेहमीचे गिऱ्हाईक होते. हल्ली कमाई जरा थांबली; पण झाली असती यापुढे. आता ते कोर्टात मॅटर चालवणार म्हणे. सगळे सोडून जात आहेत म्हणून.

सहावा : हो, त्यांचे नेहमीचे वाजंत्री आणि वऱ्हाडीपण नाही राहिले. ते एकटेच आपल्या बंगल्यावर घरगुती पद्धतीने समारंभ उरकतात हल्ली. हा हा हा...

पहिला : त्यांच्यात एक जण स्वतःच वाजंत्री म्हणून असंख्य वाद्य तोंडानेच वाजवतो.

दुसरा : हो. कान बधिर होतात ऐकून. पशुपक्षी चिडलेत त्याच्यावर. एका श्वानाने विचारले, तुम्ही जे वाद्य वाजवता तोंडाने त्यात मला भुंकल्याचा भास होतो. घ्या. आता काय बोलणार हा?

तिसरा : हो खरंय. एकदा तर त्याने चक्क ग म भ न च्या बाराखडीचे बारा वाजवले.

चौथा : अरे बाबांनो... वाढा कोणीतरी. सगळे वऱ्हाडी निघून गेले. आमच्याकडे लक्ष द्या कोणीतरी.

वाढपी : (चार तोंडी भांडे मिरवत येतो) साहेब कोशिंबीर आणि भात शिल्लक आहे. तेवढंच गोड मानून घ्या, असं साहेबांनी सांगितलं.

पाचवा : अरे, आम्ही आशेवर 'श्रीं'चे दार सोडून या नाथांच्या दारी आलो. बुंदीचे लाडू तरी वाढा.

वाढपी : सॉरी. कोर्टाने वाजंत्री आणि वऱ्हाडीसहित 'श्रीं'च्या घरी जावे, असे आदेश दिलेत. जिकडचे तिकडे असावे असा निकाल लागला. त्यामुळे आपण तिकडेच भोजनास जावे. बुंदी पाडायचे काम स्वतः 'श्रीं'च्या निवासस्थानी चालू आहे.

सहावा : अरे पण लग्न कोणाचे? काही कारण समारंभाचे?

वाढपी : ते म्हणतात, आदी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news