

राजा: कोण आहे रे तिकडे? प्रजेत काय गोंधळ चालू आहे?
सैनिक: मी आहे सरकार.
राजा: सरकार? मी महाराज आहे ना? हे सरकार काय आहे? वावटळीतून उडत आलास काय?
सैनिक: एक अजब गजब स्वप्न पडलं महाराज. त्यात मी आपल्याला सरकार संबोधले.
राजा: पुरातन काळातले कोणी भेटले का स्वप्नात?
सैनिक: पुरातन नाही, पण फार गोंधळ होता तिकडे. तोपर्यंत जाग आली.
राजा: कोणत्या युगात अडकला होता?
सैनिक: मी पाठीमागच्या गोष्टींचा विचार करत नाही, म्हणजे पुढचीच स्वप्नं असावीत!
राजा: ऑ? म्हणजे पुढच्या काळात होतात?
सैनिक : तसंच काहीसं. तिथे तेलाच्या विहिरी होत्या आणि वाद चालू होते. एक होता पिवळ्या केसांचा एक विचित्र फेटा गुंडाळलेला माणूस. बहुतेक वाळवंटाकडील दृश्य होते.
राजा: गंगेय राजाचे राज्य असेल. आमच्यापेक्षा कोणी मोठा नसेल यापुढेही. गंगेय महाराज पुढे कसे असतील. ते तर आत्ता सत्तेवर आहेत.
सैनिक : बरोबर. पण मग तो कोण होता? आणि एक मोठे नदीचे पात्र. हर्मुझ असं कोण तरी बोलत होतं.
राजा: अरे सैनिक, तू तर माझं डोकं खात आहेस. पुढे काय झाले?
सैनिक: मला जाग आली. एवढंच पाहिलं.
राजा: तुला स्वप्नं बिनकामाचीच पडतात. फुकट वेळ घालवलास. आमची रणांगणात जाण्याची तयारी करा. आमचं सिंहासन आम्हाला वाचवायचं आहे. सिंहासन बत्तिशी.
सैनिक: जरा दमाने. किती ही घाई महाराज? कहाँ राजा भोज, कहाँ गंगू तेली. आपण पाहिलेल्या तेलाच्या विहिरी आधी कुठे सापडतात का पाहू. त्यावरून जोरात वाद होणार आहेत भविष्यात हे नक्की.
राजा: तुझ्या स्वप्नाला लाव काडी. ते काही खरं नाही. तू तयारीला लाग.
सैनिक: महाराज मी खरं बोलतोय. हा संकेत समजावा.
राजा: हा संकेत काडेपेटीत बंद कर. काजवे आहेत हे. यांचा काही उपयोग नाही. दिवास्वप्न पाहा. राज्याचं भलं होईल.
सैनिक: म्हणजे भविष्याची चिंता स्वप्नावर अवलंबून कशाला? ती जागेपणी असावी. (ट्रम्प यांचा फोन उचलत) हल्लू... हा ट्रम्प महाराजा आत्ता स्वप्नातून जागा झालो. आपले सिंहासन धोक्यात आहे. असं स्वप्न होतं. सॉरी. काय हालहवाल?
युजलेस.. वाय आर यू स्लीपिंग? गो टू हार्मुझ. तिकडे तो गंगू तेली तेलाची जहाज सोडत नाही. तू इकडे बडबड करत आहेस झोपेत. कोण राजा, कोणते सिंहासन? तिकडे कमोड वर बसायची वेळ आली. उठ. दहा अरब करोडचे नुकसान केले तुम्ही अमेरिकेचे. मी सोडणार नाही. गद्दार आहे तुम्ही. विल किक यू आऊट फ्रॉम युअर कंट्री. वेट अँड वॉच.