पहिला चहा | चळवळ आणि स्नेहसंमेलन

पहिला चहा | चळवळ आणि स्नेहसंमेलन
पहिला चहा | चळवळ आणि स्नेहसंमेलन
Published on
Updated on

असा पाऊस कधीच पडला नाही आजवर, असे दर पावसाळ्यात लोक आवर्जून संभाषणातलं वाक्य बोलतात. एका मैदानावर अशीच गर्दी झाली होती आणि पावसाने त्या दिवशी नेहमीप्रमाणे मस्टरवर हजेरी लावली. पावसात भिजत गाणी गुणगुणत काही शाळकरी मुलं झाडाखाली उभी होती. त्यांना शाळेतल्या स्नेहसंमेलनात हिस्सा घ्यायचा असल्याने पाऊस हा त्यांच्या प्रॅक्टिसचाच एक भाग होता. विषय होता विद्यार्थी चळवळ. तेवढ्यात एक पोलिस तिथून जात असताना तो ड्रामा असल्याचं माहिती नसल्याने पोलीस तिथून त्यांना घेऊन लॉकअप मध्ये टाकतात. पुढे...

पोलिस : (खवचटपणे) पावसात भिजण्यासाठी काही पोरांनी म्हणे अभ्यासाची आणि शाळेची वाट चुकवली आज. नीट अभ्यास कर बाळ म्हणून पालकांनी सांगितले असेल; पण हे आले पावसात भिजायला. खरंय का रे? (पोलिस धाक दाखवत एकाकडे पाहत)

पहिला : (ड्रामा चालूच. कारण, पोलिस पण एक त्या विषयाचा भाग होते.) जाऊ दे ना वं! आई घरला वाट बघत असंल. पुनः न्हाई करणार असं. सोडा अमासनी.

पोलिस : आई ओरडणार का? बरं. का बरं भांडलात सगळे याचं कारण द्या. मी तिथून जर जात नसतो तर किती पुढं गेलं असतं हे भांडण?

दुसरा : (गालातल्या गालात हसत) सर सर. ऐका ना. हे आमचं रोजचंच हाय. आम्ही असं रोजच भांडतो. सोडून द्या वं..! बाप लय खडुस हाय. लय मारंल..!

पोलिस : काय म्हणाला बे? (सनकन त्याच्या कानशिलात) तुझा बाप कोणाला मारंल बोलला तू?

दुसरा : मला म्हटलं मी. तुम्हाला नाही. आई गं...(विव्हळत)

पोलिस : असं होय. कोणाचा तरी जीव घ्याल असे भांडता. तिकडे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी लोक भांडत आहेत. इकडे तुमच्यासारखी पोरं उनाडक्या करत फिरतात. देशात काय चालू आहे, तुमचं काय चालू आहे लेकांनो! (सिनिअर पोलिस ऑफिसर येतात)

पीएसआय : (पोरांकडे पाहत) काय

रे तुम्ही इकडे काय करता. झाली नाही का प्रॅक्टिस?

दुसरा : पप्पा. यांना सस्पेंड करा. यांनी कानाखाली लगावली माझ्या. असाच एंड आहे आमच्या टॉपिकचा.

पोलिस : सर (सॅल्युट करत), म्हणजे सर?

पीएसआय : म्हणजे काय? माझ्या मुलाचं स्नेहसंमेलन आहे. तो मित्रांसोबत प्रॅक्टिस करतोय. चौकशी करता येत नाही का नीट?

पोलिस : अहो सर, ही पोरं काहीच बोलली नाहीत.

पीएसआय : ते तुम्ही ओळखला नाहीत तुमची चूक. तुम्ही कसे वागू शकता, हे दाखवून दिलं पोरांनी. यू आर सस्पेंडेड. गेट आऊट!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news