पहिला चहा | मस्तानी आणि बिल...

पहिला चहा | मस्तानी आणि बिल...
पहिला चहा | मस्तानी आणि बिल...
Published on: 
Updated on: 

विशाखा : हॅलो... बोला. कोण बोलत आहात? ओ...सुजाता का? पण, मी नाही ओळखलं.

सुजाता : अहो, मी आईस्क्रीम पार्लरची ओनर बोलतेय सुजाता. बिल पाठवा.

विशाखा : मी मस्तानी बोलतेय. राँग नंबर.

सुजाता : मस्तानी? हे कसलं नाव. हल्ली हे शीतपेय म्हणून विकतात. हे नाव असतं? बाई, मस्करी नको.

विशाखा : मस्करीसाठी वेळ नाही.

सुजाता : हो का? काय करता आपण?

विशाखा : मी अँकरिंग करते. टीव्ही शोज असतात माझे. यू नो?

सुजाता : ओके ओके. आपल्या मिस्टरांचा नंबर द्या. हा त्यांचाच नंबर आहे बहुतेक.

विशाखा : माझाच नंबर आहे आधीपासून.

सुजाता : मंदार ॲड एजन्सी असा सेव्ह आहे हा नंबर. तुमचे मिस्टर ना ते?

विशाखा : कोण मंदार?

मंदार : अगं, मंदार मीच आहे. दे फोन... तू का अटेंड करत आहेस माझे कॉल?

विशाखा : अगं बाई! हा तुमचा आहे का मोबाईल? हा घ्या...राँग नंबर आहे. कट इट.

मंदार : दे इकडे. हॅलो मीच मंदार. बोला...

सुजाता : सुजाता आईस्क्रीम पार्लरमधून बोलतेय. बिल पेंडिंग होतं आपलं नऊ हजारांचं. आपल्या मिसेस अँकर आहेत. टीव्ही शोज करतात. त्या हे कार्ड पार्लरमध्ये ठेवून गेल्या.

मंदार : ऑ. इतकं?

विशाखा : किटी पार्टीजना माझ्याकडून मी मस्तानी देते ना सर्वांना. ते बिल आहे. देऊन टाक. आपल्याच आहेत सगळ्या.

मंदार : खरी मस्तानी आली, तरी नाही देणार.

विशाखा : ती कशाला येईल? तुम्ही कोणती बाजी मारली? साधी भाजी आणायला पैसे देत नाही. द्या ते बिल. नाही तर वाण्याचे वीस हजाराचे बिल द्यायचे बाकी आहे ते द्यावे लागेल. दोन्हीपैकी एक. नाहीतर चालले माहेरी.

मंदार : मंद आहेस का तू? इतकं बिल कोण ठेवतं? आधी सांगायचं ना?

सुजाता : आपल्या मस्तानीचे आपण बिल पे करताय की आम्ही वसूल करू?

मंदार : करा वसूल. हिच्याकडे भरपूर दागिने आहेत. नाही तर सोन्याचा भाव घसरणार आहे.

विशाखा : हॅलो..हॅलो. सॉरी मी जरा मस्करी केली. आजच पाठवते. (फोन ठेवते.)

मंदार : (फोनची रिंग होते) हां, वाणी का? हो हो. करा वसूल बिल. हिच्याकडे खूप दागिने आहेत. (फोन बाजूला ठेवत) अब आएगा मजा. ट्रम्प तू भी सोना ले जा. हा हा... देशाचा जीडीपी घसरला यांच्या दागिने घातलेल्या डीपीमुळे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news