पहिला चहा | जीना इसिका नाम है...

पहिला चहा | जीना इसिका नाम है...
पहिला चहा | जीना इसिका नाम है...
Published on
Updated on

महाविकास आघाडीकडून एनसीपीचे एमएलए कंबर खोचून उबाठाच्या बाजूने भाषणास यावेळेस उभा राहिले. राम राम पाव्हणं! कसं काय? बरं हाय नव्हं? खूप दिवसांनी मी पत्रकारांसमोर येतोय. सांभाळून घ्या. नाही तरी एवढ्या साऱ्यांची भाषणं आपण ऐकून मराठीची लंडनला धाडणी केली की काय, असं वाटून घेतच असणार. काय ते इंग्रजी मिसळलेली मराठी, काय बोलतात एकेक कोण जाणे. अध्यक्ष महोदयांनी जरा जबाबदारीने वक्तव्य करावं, असं कोणालाही सभागृहात सुचवावे असे वाटले नाही. असो. कायदेपंडितना कोण काय बोलणार?

मुद्दा असा की, त्यांना सांभाळून घेतला तसे मलाही सांभाळून घ्या. ते अडबंडू का काय ते असले शब्द आम्ही ऐकले नव्हते इंग्रजीत. (आदीबाळ कानाशी येत) काका, अबंडंट असा शब्द आहे तो. हा अबंडंट का काय ते! कशाला हो असले विचित्र शब्द आणता मराठीचा अंत करायला. सुटसुटीत मराठीत बोलावं ना? आम्ही इंग्रजीचा अपमान नाही करत. इंग्रजी येते आमच्याकडे अपमानित होण्यासाठी असे समजावे मग. (आदी बाळ मिश्कील हसत.)

हो की नाही? ऑपरेशन पार पडलं आता कुठलं बाकी नाही राहिलं. टायगरनंतर कोल्हा वगैरे असेल ते बघून घेतील. मुंढे आल्यापासून सगळ्या लॉबी धोक्यात. पुढे यांची अवस्था बघण्यासारखी असेल. लाचखोर मंत्री अडकित्त्यात्त सापडतो; पण त्यामागे दुसराच कोणी असतो. लोकशाही वाचवायची कशी ते पाहिले पाहिजे. लोकशाही संपत चालली. मुंढे पदावर आहेत म्हणून सगळं ठीक होईल; पण त्यांना त्यांच्या जागेवरून हलविण्यासाठी अडीचशे कोटी जमा केलेत लॉबीने. हा घोटाळा कसा थांबणार? सरकारने दखल घ्यावी. आम्हाला, आमच्या आमदारांना बसायला कार्यालयं नाहीत. सगळ्या आमदारांना जिन्यावर बसून जेवण करावं लागेल. त्याचं काय? जिन्यावर बसून चालेल का?

'जिना इसिका नाम है!' (आदीबाळ हळूच बोलला.)

'हा बरोबर. जीना इसिका नाम है. छान सुचवलास हा. भाषणात भर टाकायचीच होती. तेवढाच मसाला.’

तर आता इथं आमदारांचा प्रश्न उरलाच नाही. ते आमचे आहेत ते आमचेच राहतील. कोणी आमदार सभेस अनुपस्थित नव्हते. सगळेच हजर होते. कोणत्याही ऑपरेशनला ही आघाडी घाबरत नाही. तेवढंच सांगायला एनसीपीकडून आलोय. जातो! माझं काम झालं. धन्यवाद!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news