पहिला चहा | कंगना व्हर्सेस प्रियांका

पहिला चहा | कंगना व्हर्सेस प्रियांका
Published on
Updated on

जंतर-मंतरवरून वादाला तोंड फुटले असताना इकडे संसदेत कंगनाने तोंड उघडले. झाकण अजून उचकटल्याने प्रियांका धावली. इकडे पक्षात वादळ उठले की, या बाईला कुठून काय आठवलं? यावर अजून विरोधी पक्षनेतेही संशोधन करत आहेत. पुढे...

कंगना : जेन झी म्हणजे *** हे मी शॉर्टफॉर्म बोलले. गलका करणारे, टायगर्स, रस्त्यावर आंदोलन करणारे... अशा अर्थाने कौतुकच केले होते. पुढचे कोणी ऐकूनच घेत नव्हते म्हणून ठीक आहे.

प्रियांका : आता या सारवासारव करत आहेत. यांच्या भाषेवर प्रश्न उपस्थित होतोय. या नेहमीच असं काहीतरी वादाला पाणी घालत राहतात. जेन झी तुम्हाला समजणार नाहीत. त्यांच्या विचारांत आपल्या आचरणात खूप तफावती आहेत. त्यामुळे प्रश्न सुटणार नाही.

कंगना : माओवादी, नक्षलवादी या संघटनांना आपण वाव देता. आदिवासी प्रश्न वेठीस धरता. आज एक आदिवासी स्त्री देशाच्या राष्ट्रपती आहेत.

प्रियांका : आपल्यावरही आपल्या पक्षाने उपकारच केले. हिमाचल की आप गंगा समझके. आप पावन है (प्रणाम करत). गाना गायिये, 'सून सायबा सुन.' और खुशीसे बहिये. बस यही आपको शोभा देगा.

कंगना : हे बघा, आम्ही सांगितले आम्ही शॉर्टफॉर्म सांगितला. आम्हाला तसे म्हणायचे नव्हते.

प्रियांका : देश की गंगा आपही है. बस यही तो बोला हमने. गोमूत्रसे भी बेहतर तो पाणी ही होता है. वो आप है. इसमे हमारा ही भाग्य है कंगना जी. आप मत रोयिये!

कंगना : काय करणार, मी बोलले की, आपण विरोधी पक्षवाले उलटाच विचार करता.

प्रियांका : काय करणार? आम्ही चित्रपट पाहिले आपले.

कंगना : माझी भूमिका आवडली बहुतेक आपल्याला इंदिराजींची. आजीची आठवण आली असेल ना?

प्रियांका : आजी स्वप्नात आल्या. तुम्हाला शोधत होत्या. त्यांना माहिती नाही तुम्ही विरोधी पक्षात अगर राजकारणात सध्या भाषणाची पण ॲक्टिंग करता.

कंगना : काय सांगता? का शोधत होत्या म्हणे!

प्रियांका : त्यांना एक गोष्ट खटकली, स्वप्नात हां. रिअल नाही.

कंगना : कोणती ?

प्रियांका : 'राम तेरी गंगा मैली'मध्ये तुम्ही होता, असा भ्रम झाला होता त्यांचा. त्या म्हणत होत्या, हीच का ती गंगा भूमिका मैली करनेवाली? (कंगना गटारीत लपून बसली आहे. अर्थातच एक सिनेमातला रोल)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news