पहिला चहा | कुचुपुचू कंगनाजी

पहिला चहा | कुचुपुचू कंगनाजी
पहिला चहा | कुचुपुचू कंगनाजी
Published on
Updated on

जेन-झी १: ब्रो, कुचुपुचू कंगना मॅम आपल्याला गटर जनरेशन म्हणतेय.

जेन-झी २: मला तर वाटलं नवीन फिल्मचं प्रमोशनंच करताहेत.

मिलेनियल १: प्रत्येक वेळी कुणाला तरी नाव ठेवल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही काय?

मिलेनियल २: आधी शेतकरी, अधे-मध्ये करण जोहर, मध्येच रा. गा. आणि आता जेन-झी.

जेन-झी १: प्रश्न विचारले म्हणून आम्ही 'गटर जनरेशन' झालो का?

मिलेनियल १: अरे, प्रश्न विचारणं काहीजणांना नेहमीच अस्वस्थ करतं. उत्तरं देता आली नाहीत की, अशी विशेषणं लावणं सोप्प असतंय...

जेन-झी १: विशेषणं? यू मीन ॲडजेक्टिव्ह नो? (सगळे हसतात)

मिलेनियल २: स्क्रिप्टनुसार संवाद बोलायची सवय आहे रे त्यांना. फक्त आता 'कट' म्हणायला दिग्दर्शक नसेल.

मिलेनियल १: सोशल मीडियातील ट्रोलिंग त्यांना माहितीय की! ते वाचले की कळते गटर नेमकं कुठे वाहतंय?

जेन झी २: डुड, आपण काय करायचं?

मिलेनियल २: अल्गोरिदमला तेच हवयं.

मिलेनियल १: अरे वादातूनच सेलिब्रिटी ट्रेंडिंगमध्ये राहतात.

मिलेनियल २: बरळण्यासाठीचा ऑस्कर फेकून मारला पाहिजे काही कलाकारांना...

मिलेनियल १: बायदवे, त्याही चर्चेत असायच्या की हृतिक, अध्ययन सोबत. बोल्ड भूमिकाही करायच्या. आता लेक्चर देतात...

मिलेनियल २: फॉलोअर्स वाढले की, जबाबदारी वाढायला हवी. विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी पीटर पार्कर, हाहाहा...

जेन-झी १: मला वाटतंय आम्ही कन्फ्यूज्ड जनरेशन आहोत.

मिलेनियल १: का?

जेन-झी १: कारण, आम्हाला कळत नाही, प्रश्न विचारायचे की आधी परवानगी घ्यायची?

मिलेनियल २: अरे, जेन झी जर गटर जनरेशन असेल, तर या पिढीला गटर बनवलं कुणी? गटर वरूनच वाहत आले असेल ना?

मिलेनियल १: बरं झालं नदी म्हणाली नाही... नाही तर प्रदूषणालाही तुम्हालाच जबाबदार धरले असते.

जेन-झी २ : आमची जनरेशन वाईट आहे?

मिलेनियल २ : अरे, प्रत्येक पिढीला पुढची पिढी वाईटच वाटते.

जेन-झी १: म्हणजे आम्ही गटर जनरेशन नाही?

मिलेनियल्स : नाही. तुम्ही नोटिफिकेशन जनरेशन आहात.

(स्मार्ट फोनवर नोटििफके­शन येते)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news