पहिला चहा | ‘थलैवा’का जलवा...

पहिला चहा  | ‘थलैवा’का जलवा...
पहिला चहा | ‘थलैवा’का जलवा...
Published on: 
Updated on: 

फॅन १ : यन्ना रास्कला... माईंड इट! अण्णाचा नवा पिक्चर आलाय थिएटरमध्ये...

फॅन २: अण्णा बोले तो..

फॅन १ : अबे, अण्णा... अण्णा... रजनीअण्णा... रजनीकांत... महानायक,

द बॉस, थलैवा!

फॅन २ : सॉरी, सॉरी... (दोन्ही कानांना हात लावतो) रजनीअण्णा सुपर...

फॅन १ : भावा, क्रिकेटपटू संजू सॅमसनदेखील आपल्यासारखाच थलैवाचा मोठा फॅन निघाला..

फॅन २ : होय? काय केलंय नेमकं त्यानं...

फॅन १ : आपण कसं थलैवाची मोठमोठी पोस्टर्स, कटआऊटस्‌ उभारतो.. त्याला दुधाचा अभिषेक घालतो, मोठमोठ्या हारांच्या माळा घालतो... थिएटरमध्ये एंट्रीवर जल्लोष करतो... संजूही तसाच...

फॅन २ : थलैवाचा आणखी एक फॅन....

फॅन १ : रजनीकांतच्या ‘जेलर २’ साठी संजूने अख्खं थिएटर बुक केलं होतं!

फॅन २ : अख्खं थिएटर? नक्की सिनेमा बघणारेय की थिएटरचा मालक बनणार आहे?

फॅन १ : त्याला थलैवाचा पिक्चर एकट्याने नाही, तर कुटुंबीय, मित्र आणि टीममधल्या सहकाऱ्यांसोबत बघायचा होता!

फॅन २ : हा तर थलैवाचा जबरा फॅन निघाला...

फॅन १ : पण, रजनीकांतची क्रेझच तशी आहे रे! त्याची एंट्री म्हणजे थिएटरमध्ये भूकंप, आणि त्याने चष्मा फिरवला की त्सुनामी!

फॅन २ : नाहीतरं काय... जबरदस्त.. आपण जायचं का पुन्हा...

फॅन १ : रीलिजच्या दिवशी संजूला चित्रपट पाहता आला नाही, म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने हा खास शो बुक केला.

फॅन २: याला म्हणतात डेडिकेशन! आपण आवडता सिनेमा चुकला तर ओटीटीवर येण्याची वाट बघतो. ओटीटी ठीक आहे; पण थलैवाचा ऑरा हा मोठ्या पडद्यावरच अनुभवायचा असतो!

फॅन १ : रजनीकांत यांना कळलंय का की संजूने अख्खं थिएटर बुक केलंय ते?

फॅन २ : आज ना उद्या कळेलच की... मग थलैवा फक्त चष्मा फिरवेल आणि म्हणेल, ‘संजू… सु...प्पर!’

फॅन १: बस्स! आणि त्या एका शब्दासाठी संजू आणखी एकदा शो बुक करू शकतो हा...

फॅन २: क्रिकेटमध्ये संजू सॅमसन विकेटच्या मागे असतो… पण, रजनीकांतच्या बाबतीत त्याचं हृदयच क्लीन बोल्ड झालंय!

फॅन १ : फॅनगिरी अनलिमिटेड! संजू भाई, तू थिएटर बुक नाही केलंस, तू फॅनडमचा नवा बेंचमार्क सेट केलास!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news