पहिला चहा : ट्रम्पचे ड्रोन...

पहिला चहा : ट्रम्पचे ड्रोन...
पहिला चहा : ट्रम्पचे ड्रोन...
Published on: 
Updated on: 

इराण आणि रशिया फोन कॉलवर व्यस्त आणि एक पुसटशी शक्यता घेऊन रशिया इराणला सतर्कतेचा इशारा देतो! पाहूया पुढे काय घोळ घालतो इराण आणि ट्रम्प!

इराण : तो ट्रम्प काल भाषणात काहीतरी बोलून गेला. खूश होता.

रशिया : तो थोबड उचकटूनच असतो नेहमी. नेमके काय झालं?

इराण : काल तो बोलला आम्ही काय आहे ते दाखवून देऊ. इथे तिथे सगळीकडे आम्हीच असू. हे काय होतं समजलं नाही.

रशिया : तो सगळीकडे आजकाल भुतासारखा फिरतो. कधी मेलनीवर पाळत ठेवतो कधी तुमच्यावर. मिस्टर इंडिया समजतो तो.

इराण : तो अमेरिकन आहे. इंडियाशी त्याचं नातं स्ट्राँग नाही. सरड्याची चाल खेळतो तो.

रशिया : मिस्टर इंडिया म्हणजे मूवी मधला. लेस नॉलेज कॅन बी डेंजरस. बी केअरफुल.

इराण : आम्ही नाही पाहात मूवी.

रशिया : मिस्टर इंडिया म्हणजे तो कुठे गायब होतो यावर अभ्यास करा. समजेल.

इराण : त्याची स्माईल विचित्र आहे, हायना (प्राणी) पण लाजेल. कितीही करार करा. मागे जातो, पुन्हा येऊन मानेवर बसतो. हायना कुठचा.

रशिया : हा हा... हो ना! गुड सेन्स ऑफ ह्युमर. पण ट्रम्प इराणला लागलेला ट्यूमर आहे. हायना का बायना घेतल्याबिगर जाईना, असा आहे तो. पाण्याखाली पण लपेल.

इराण : यू मीन टू से... अंडरवॉटर?

रशिया : यप... राईट.

इराण : काल रात्री गस्त घालताना पाण्यातून विचित्र हालचाली जाणवल्या. अहो, पाण्यावर नारळाची झावळी तरंगत होती. मला थोडा वेळ वाटलं ट्रम्प पाण्याखालून चालला आणि विग वरती राहिला की काय?

रशिया : जरा डोकं चालवा कधीतरी उलटं. त्याची उलटी खोपडी आहे. तो कसा दिसेल तुम्हाला? त्याच्याकडे खूप मोठी यंत्रणा आहे.

इराण : तोच यंत्रमानव आहे की काय याचा शोध लावला पाहिजे. हसतो रोबोसारखा.

रशिया : अहो, तुम्ही त्याच्या हसण्याकडे दुर्लक्ष करा. तो एक कटाचा भाग आहे. इटस्‌ ऑल फेक. तुम्ही आत्ता कुठे आहात?

इराण : नियर वॉटर. काही सुचवायचं आहे?

रशिया : आम्हालाच सुचवावं लागतं. ऐका. अंडरवॉटर ड्रोन असू शकते. चेक करा.

इराण : म्हणजे तो ड्रोन होता?

रशिया : कुठे?…

इराण : पाण्यात काहीतरी असल्याचा भास झाला. मी काल बॅरल समजून घरी नेला.

रशिया : वाह, यालाच म्हणतात ट्रम्पची करणी ड्रोनमधे पाणी... इटस्‌ अंडरवॉटर ड्रोन रास्कल्स. खुद भी मरेगा, मुझको भी मरवायेगा क्या. विल्हेवाट लावा. लवकरात लवकर. हरी अप...!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news