पहिला चहा | जर्मनी ते परभणी

पहिला चहा | जर्मनी ते परभणी
पहिला चहा | जर्मनी ते परभणी
Published on
Updated on

मित्रांनो आणि कार्यकर्त्यांनो, एकच म्हण श्रेष्ठ असे वाटून राहिले आता. जगात जर्मनी आणि देशात परभणी! खूप आदरातिथ्य करता परभणीकर. मी आपल्याला सांगू इच्छितो. सगळे गुलाम गद्दार निघाले. परभणीकर नाही. पळपुटे सरदार! यांना आता वतन हवे, सारे हवे. आम्ही एकले सरदार काय करणार! शिवीगाळ हा आमचा धंदा नव्हता. पण आता ट्रेंड आला म्हणून करतो कधीतरी शिवीगाळ! त्यात काय?

भाषण साहेबांसारखं झालं पाहिजे. फाटक्यात पाय घालून का पळावे कोणी. हे पळाले. आणावे कोणी? (कमरेवर हात ठेवत.) थोडक्यात आम्ही थोरल्या साहेबांसारखे भाषण करतो म्हणून तरी येतील. अगदी परखड. परवड नाही झाली पाहिजे शब्दांकडून. आम्ही अगदी तसेच बोलून आमचे शिलेदार परत मिळवू. खात्री आहे. शिव शिव शिव! सेनेत आम्हीच आहोत पहिल्यापासून म्हणून लाचार नाही झालो सत्तेसाठी. सेना ही आमचीच आहे. हे कोण? सेना स्थापन करून मूळ सेना उद्ध्व‌स्त करू पाहात आहेत. आमच्या मुळावर घाव घालू नये. सांगून ठेवतो. मूळ गेले पण खोड राहिले. तेही घेऊन जाल बरोबर (आदीबाळ). सेनेचे भवितव्य धोक्यात असले तरी पुन्हा एकत्र येऊन पक्ष स्थापन करू. विरोध्यांना चिंता नसावी.

या परभणीकरांनी जेवढी साथ दिली, तेवढी सेनेला कुठेच नाही साथ लाभली. ते ठाम आहेत आपल्या मताशी. त्यामुळे त्यांची मतं आम्हालाच. कोणी काही म्हणो, आम्ही कमरेवर हात ठेवला की थोरले साहेब आमच्या पाठीशी उभे आहेत असे वाटते. त्यामुळे पाठीमागे उभे होते ते विरोधी पण आमच्या पुढे गेले. याची खंत वाटते. बाळासाहेबांचा आशीर्वाद पण मागच्या मागे पळवला की काय या गद्दारांनी असे वाटते. असे होणे शक्यच नव्हते. इतर पक्षासाठी वेगळे नियम आणि सेनेसाठी वेगळे नियम हा सत्ताधाऱ्यांचा नवीन कट आहे आमच्याविरुद्ध.

अरे बंडू, तू अक्कल नको सांडू. बिनडोक बंडूला सांगा कोणीतरी, असे कितीतरी बंडू पक्षावरून ओवाळून टाकलेत आम्ही. आम्हाला फिकीर नाही त्याची. काणे साने कोणीही काहीही बोलू देत. आधी आमच्याकडेच होते हजेरी लावायला. ते विसरलेत मालकाला. आम्ही विसरू शकत नाही. आम्ही कमरेवरचा हात असाच ठेवून बोलू. गवळण सांगत नाही लोककलेतली. भाषण आहे हे परभणीकर हो. समजून घ्यावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news