पहिला चहा : उरबडवे...

पहिला चहा : उरबडवे...
पहिला चहा : उरबडवे...
Published on: 
Updated on: 

संगणक आणि मोबाईल ही साधनं गळ्यातला ताईत आहेत आजच्या पिढीच्या. बोबडं बोलणारं मूलदेखील नशा चढल्यावर झिंगाट नाचतात तसा नाच करू लागतात, मोबाईल दिसला रे दिसला की. म्हणूनच त्याला भ्रमणध्वनी म्हणत असावेत काही लोक. मोबाईल हे त्याचे प्रचलित नाव आहे तरीही. तशीच गत मोठ्यांची. त्यात डोकावून डोकावून डोकी चालेनाशी झाली तरी कॅमेरा ऑन करून बडबड करताहेत. सारे एक माळेचे मणी. अगदी सरसकट. कंटेंट काही असो, बटण दाबले की, आम्ही देवाप्रमाणे सर्वांसमोर प्रकट झालो पाहिजे, आपले म्हणणे पटू दे अगर नाही पटू दे. धिंगाणा घालूनच दम काढणार. काय ही नशा इलेक्ट्रॉनिक माध्यमांची? चांगले कंटेंट आहेत बरेचसे, वाद नाही. निव्वळ करमणूक करणारे टिकटॉकही ठीक आहे विरंगुळा म्हणून! सामान्य माणसं कलेत गुंतली त्यामुळे. तेही ठीकच आहे, पण जास्त टीकास्त्र चालवणेही योग्य नाही. म्हणून आपलं बातम्यांचं चॅनेल लावून बसावं.

तिथेही काही प्रवक्ते फक्त आपलंच म्हणणं पटवून देत ऊर बडवत बसतात. तो ऑरी हो, उरावर बसून आशीर्वाद तरी देतो, पण हे स्वतःचा ऊर स्वतःच बडवून घेतात. टू मच मिमिक्रीचा मसाला ॲड केला की झालं यांचं कंटेंट रेडी. मुख्य मथळा सगळ्यात शेवटी, राजकारण यांचंच चालू असतं. नेते बाजूलाच! सगळेच प्रवक्ते त्यातले नाहीत. पण एक-दोघे मस्त बरळत असतात. ऐकणाऱ्याचे कान गाढवासारखे ताठ उभे राहतात, बाकी काही बदल होत नाही विचारात आणि आचारातसुद्धा. रीळ संपली की, ‘शाळा सुटली - पाटी फुटली’ ही म्हण आठवेल इतपतच डोकं चालतं. त्यांचं बोलणं ही अलवार होत होत तलवार हाती घेतल्याप्रमाणे मुद्द्यावर उडी मारतात... पाहा.

वरुण : नमस्कार, मी वरुण....! माझ्या चॅनेलवर मी आपलं स्वागत करतो. आत्ताच आलेल्या माहितीनुसार मी या केसवर खोलवर विचार केला. हे प्रकरण घडलं त्यामागे अमुक एकाचा हात आहे. हे स्पष्ट आहे. तरीही सीबीआय चौकशी करत आहे. त्यांनी ती लवकर उरकावी. नाहीतर आम्ही त्यांची चौकशी लावू.

करुण : नमस्कार. मी अर्थातच करुण. आपलं सर्वांचं चॅनेलवर स्वागत आहे. या अमुक एका केसमध्ये तमुकांचा काही संबंध नाही. ते सगळे निर्दोष आहेत हे मी आता माझ्या ब्लॉगवर टाकलंय. हेच खरं आहे. कोणाला पटो, ना पटो. सीबीआयने खरे पुरावे दाखवावेत, अन्यथा दुसरी केस टाकावी लागेल. धन्यवाद.

(शेवटी वरुण आणि करुण सीबीआयला दोषी ठरवून चॅनेलला सबस्क्राईब करायला लावून राम राम ठोकतात. यांच्या दृष्टी ने केस संपली. हे असंच चालायचं)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news