विद्यार्थी तणावमुक्त होण्यासाठी…

विद्यार्थी तणावमुक्त होण्यासाठी…

आयआयटी आणि एम्ससारख्या नामांकित इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी इच्छुक असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी राजस्थानातील कोटा हे शहर कोचिंगची राजधानी बनलेली आहे; मात्र सध्या कोटा येथील कोचिंग संस्था आत्महत्या रोखण्यावर अधिक भर देत आहेत. यावर्षी आतापर्यंत 23 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असून गेल्या आठ वर्षांतील हा उच्चांक आहे. कोटातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या विचार करावयास लावणार्‍या आहेत. आयआयटी आणि एम्ससारख्या नामांकित इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी इच्छुक असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी राजस्थानातील कोटा हे शहर कोचिंगची राजधानी बनलेले आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेत चांगली कामगिरी करण्यासाठी तयार करण्यात येते.

मात्र, सध्या कोटातील कोचिंग संस्था अ‍ॅडव्हान्स कॅलक्युलस किंवा न्यूटनी यांत्रिकी शिकवण्याऐवजी आत्महत्या रोखण्यावर अधिक भर देताना दिसून येताहेत. यावर्षी आतापर्यंत 23 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि ही संख्या गेल्या आठ वर्षांतील सर्वाधिक आहे. परिणामी, गळफास घेण्यासारख्या घटना टाळण्यासाठी हॉस्टेलमध्ये स्प्रिंगचे फॅन बसविणे बंधनकारक केले आहे. टोलेजंग इमारतीच्या गच्चीवर आत्महत्याविरोधी लोखंडाची जाळी बसविण्यात आली आहे. अशा घटनांनी चिंताग्रस्त झालेल्या कोचिंग क्लासच्या चालकांनी सध्या तपासणी आणि परीक्षेवर तात्पुरती बंदी घातली आहे. या ठिकाणी पोलिस ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी विशेष विभाग सुरू करण्यात आले आहेत.

कोचिंग क्लासमध्ये असंख्य निरीक्षक, समुपदेशक असून ते विद्यार्थ्यांच्या ताणतणावाचे आकलन करत आहेत आणि त्यांच्यातील बदलाचा, लक्षणांचा मागोवा घेत आहेत. चोवीस तास सुरू राहणारी हेल्पलाइन क्लिनिकही आहे. अर्थात्, आत्महत्या रोखणे हा एक किचकट प्रकार आहे आणि त्यामागची कारणेही आपल्याला ठाऊक आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे अपेक्षांचे लादलेले ओझे. प्रामुख्याने आई-वडील हे मुलाला घरदार विकून, जमीन विकून, पीएफचे पैसे काढून कोटा येथील कोचिंग क्लासमध्ये घालतात आणि मुलांकडून आयआयटी किंवा वैद्यकीय प्रवेशाची आस लावून बसतात. मात्र, दीर्घकाळापर्यंत एकाच प्रकारचा सतत अभ्यास केल्याने येणारा एकाकीपणा, नैराश्य आणि पालकांची आठवण येत असल्याने आत्महत्येसारखे विचार त्यांच्या मनात घोळत राहतात. कोटा येथे बहुतांश विद्यार्थी बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांतून येतात. या ठिकाणी एखादी आत्महत्या झाली तरी असे शेकडो, हजारो विद्यार्थी हतोत्साहित आहेत ज्यांनी खचून आत्महत्या केलेली नाही. तरीही गेल्या तीन वर्षांत कोटा येथे विद्यार्थी येण्याची संख्या दुपटीने वाढली आहे. या ठिकाणी 2 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी चोवीस तास, सातही दिवस 18-18 तास अभ्यास करतात.

शहरात असेही शेकडो कोचिंग क्लास आहेत की ते पेईंग गेस्ट, खानावळ, परिवहन अन्य सेवा देतात आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देतात. असे म्हटले जाते की, या ठिकाणी कोचिंग उद्योगाची वार्षिक उलाढाल ही आयआयटी आणि एम्सच्या एकूण वार्षिक बजेटपेक्षा अधिक आहे. कोटाचे बिझनेस मॉडेल हे तीन प्रकारच्या विद्यार्थ्यांची गरज भागविण्याचे काम करते. फाऊंडेशन, रनिंग आणि ड्रॉपर बॅच. फाऊंडेशनमध्ये सातवीपासूनच अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांचा समावेश असतो. रनिंग म्हणजे चालू बॅचमध्ये अकरावी व बारावी वर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश असतो आणि ड्रॉपर बॅचमध्ये बारावीनंतर पुढील वर्षांत प्रवेश न घेणार्‍या विद्यार्थ्यांचा समावेश असतो. एवढेच नाही तर दुसर्‍यांदा प्रयत्न करणार्‍या विद्यार्थ्यांचा देखील या बॅचमध्ये समावेश असतो. टॉपर्सचे उदाहरण देण्यासाठी त्यांची विशेष व्यवस्था केली जाते. एवढेच नाही तर प्रवेश परीक्षेतील काही टॉपर्सना चांगले मानधनही दिले जाते, जेणेकरून कोचिंग संस्थांना आपल्या जाहिरातीत त्यांचा उल्लेख करता येईल. या बळावर कोचिंग क्लासेस हे नवीन प्रवेशासाठी फ्रेशर्सना प्रेरित करतात. कोटा सिंड्रोम एवढा चर्चेत आला आहे की नेटफ्लिक्सवर एका मालिकेतही तो दाखविला आहे. कोचिंग क्लासच्या वर्गावर बंदी आणून या प्रश्नांवर तोडगा काढता येणार नाही. यासाठी स्पर्धा परीक्षेत किंवा प्रवेश परीक्षेत मिळणार्‍या यशातून लाभणारी सामाजिक प्रतिष्ठा ही कमी करणे गरजेचे आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांवरचा तणाव आणि दबाव कमी राहील. यासंदर्भात नितीन पै आणि अजय शहा यांनी एक अनोखा मार्ग सांगितला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news