

1915 साली आईन्स्टाईन यांनी दुसरा ग्रंथ प्रसिद्ध केला आणि त्यात सापेक्षवादाचे विस्तृत विवेचन केले. प्रकाशाच्या शोधाबद्दल सांगताना त्यांनी असा दावा केला होता की, विश्वातील इतर तार्यांची किरणे सूर्याजवळून जात असताना एक होतात. पदार्थ विज्ञानातील त्यांच्या फोटो इलेक्ट्रिक परिणामांच्या शोधाबद्दल त्यांना जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले.
जगात अनेक चमत्कार काहीच न करता घडत नसतात, तर या चमत्कारांमागे असते प्रचंड श्रम आणि अफाट बुद्धिसामर्थ्य. सिद्धीच्या अहमदनगर साम्राज्याचा शासक सुलतान मलिक अंबर हा पूर्वी एक गुलाम होता. 1549 मध्ये आफ्रिकेतील इथियोपियात जन्मलेल्या चेपू नावाच्या या गुलामाला त्याच्या माता-पित्याकडून मीर कासिम नावाच्या व्यापार्याने विकत घेतले अन् अरबी भाषेत नाव ठेवले मलिक अंबर. त्यानंतर कासिमने मलिक अंबरला बगदादच्या बाजारात विकले. तेथून या गुलामाला चंगेजखानाने विकत घेतले. स्वतःची खरेदी-विक्री उघड्या डोळ्यांनी पाहात मलिक अंबर तत्कालिन हिंदुस्तानात दाखल झाला. स्वामीनिष्ठ असलेला मलिक अंबर युद्धशास्त्रात अत्यंत निपुण होता. याच बळावर तो पुढे कसलेला योद्धा बनला. एक हबशी गुलाम, सर्वोत्तम प्रशासक कसा बनू शकतो, याचा वस्तुपाठ त्याने अहमदनगर साम्राज्याचा सुलतान बनताच घालून दिला. पूर्वाश्रमीचे खडकी आणि अलीकडेच नामांतर झालेल्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहराची निर्मिती याच अंबरने केली.
विज्ञानात क्रांती करून जगाला चकित करणार्या अल्बर्ट आईन्स्टाईनचा जन्मही जर्मनीच्या ईशान्य भागातील व्हेरिया प्रांतातील उल्म या गावी झाला. त्याचे बालपण आणि युवावस्था अत्यंत संघर्षमय आणि खडतर परिस्थितीत गेले. त्याच्या वडिलांचा इलेक्ट्रो- केमिकल्सचा कारखाना होता; पण तो दिवाळखोरीत गेल्याने त्यांनी म्युनिक शहरात स्थलांतर केले. आईन्स्टाईन लहानपणी मंदबुद्धीचा समजला जात असे. मात्र, त्याला गणित, विज्ञान आणि संगीत विषयांची फार आवड होती. अस्थिरतेमुळे त्याचे कुटुंब पुन्हा स्थलांतरित झाले. यावेळी त्यांनी दक्षिण इटलीतील मिलान या शहरात बस्तान मांडले. या शहरात अल्बर्टला वाटू लागले की, आपण काहीतरी करावे. त्याने उपलब्ध असलेले सर्व ग्रंथ वाचून काढले. त्याची बुद्धिमत्ता हळूहळू तीक्ष्ण आणि धारदार होऊ लागली. आकलनशक्तीला धुमारे फुटले. वाचनप्रियतेने त्याला गणिताचे वेड लावले आणि वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्याने बीजगणितातील भौतिकाची गणिती समीकरणे आत्मसात केली. भूमितीशास्त्र व कॅलक्युलसमध्ये तो निष्णात बनला.
त्याने आपले शिक्षण टप्प्याटप्प्याने पूर्ण केले. मात्र, कमालीची आर्थिक चणचण असल्याने त्याने कारकुनाची नोकरी केली. तथापि, संशोधन कार्य सोडले नाही. एक साधा कारकून पीएच.डी. साठी शोधप्रबंध तयार करतो, ही त्या काळातील अतिशय आश्चर्यकारक घटना होती. आईन्स्टाईनच्या प्रबंधाचा विषय होता – सापेक्षतेची खास उत्पत्ती. विश्वाचा शोध आणि वेध घेण्याच्या इच्छाशक्तीने आईन्स्टाईनला पछाडले होते. यापूर्वी अनेक शास्त्रज्ञांनी विश्वातील घटनांचे शास्त्रीय अर्थ लावण्याचे प्रयत्न केले होते. परंतु, त्यात कुणालाही यश मिळाले नाही. विश्वातील विविध घटनांवर संशोधन सुरू असताना अमेरिकेतील मायकल्स व मोर्ला यांनी प्रकाश किरणांच्या गतिसंबंधी केलेले संशोधन त्याच्या वाचनात आले. यावेळी आईन्स्टाईनची कुशाग्र बुद्धी तळपली अन् त्याने जन्माला घातला सापेक्षवादाचा सिद्धांत. या सिद्धांताच्या बळावर त्याने इतर शास्त्रज्ञ मानत असलेली विश्वाची कल्पना चुकीची ठरवली. हे वर्ष होते 1905. डशिलळरश्र ढहशेीू ेष ठशश्ररींर्ळींळीूं (विशिष्ट सापेक्ष सिद्धांत) या संशोधनाने आईन्स्टाईनला जगभर प्रसिद्धी मिळाली. जगातील तमाम शास्त्रज्ञांच्या नजरा आईन्स्टाईनकडे वळल्या. आता आईन्स्टाईन महान शास्त्रज्ञ बनले होते. 1915 साली आईन्स्टाईन यांनी दुसरा ग्रंथ प्रसिद्ध केला आणि त्यात सापेक्षवादाचे विस्तृत विवेचन केले. प्रकाशाच्या शोधाबद्दल सांगताना त्यांनी असा दावा केला होता की, विश्वातील इतर तार्यांची किरणे सूर्याजवळून जात असताना एक होतात. हा प्रयोगही त्यांनी 1919 साली झालेल्या खग्रास सूर्यग्रहणावेळी सिद्ध करून दाखवला. पदार्थ विज्ञानातील त्यांच्या फोटो इलेक्ट्रीक परिणामांच्या शोधाबद्दल त्यांना जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले.
1933 साली जर्मनीची सत्ता हुकूमशहा हिटलरकडे आली. ज्यू जमातीचे जर्मनीतून उच्चाटन करणे हा हिटलरचा एक कलमी कार्यक्रम होता. आईन्स्टाईन हे ज्यू असल्याने त्यांनी जर्मनी ही मायभूमी सोडून अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. दुसर्या महायुद्धाच्या अखेरच्या पर्वात अमेरिकेने जो संहारक अणुबॉम्ब तयार केला तो आईन्स्टाईन यांनी शोधून काढलेल्या तत्त्वावर आधारलेला होता. हा फॉर्म्युला होता, ए= चउ2 (ऊर्जा = वस्तुमान ु प्रकाशाच्या वेगाचा वर्ग) आपण केलेल्या संशोधनाचा फायदा अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी व्हावा, असे त्यांना मनोमन वाटत होते. परंतु, अमेरिकेने जेव्हा जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला, तेव्हा मात्र त्यांना जबरदस्त मानसिक हादरा बसला. कित्येक दिवस आईन्स्टाईन या धक्क्यातून सावरू शकले नाहीत.