आता मोबाईल राहील कूल

आता मोबाईल राहील कूल
Published on
Updated on

जगातील सर्वात मोठा मोबाईल शो यंदा बॉर्सिलोनामध्ये घेण्यात आला. या मोबाईल शोमध्ये विविध मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांनी त्यांचे नवीन गॅजेटस्, तंत्रज्ञान आदींचे सादरीकरण केले होते. चिनी स्मार्ट फोन निर्माता कंपनी वन प्लसने 145 वॅटचा लिक्विड कूलर सादर केला होता, जो मोबाईल फोनला गरम होण्यापासून वाचवेल. सध्या बहुतेक फोन आधुनिक तंत्रज्ञानासह मार्केटमध्ये येत असतात. यामध्ये पॉवरफूल प्रोसेसर, ग्राफिक्स आदी अनेक फिचर्स दिले जातात. मोबाईल फोन थंड ठेवण्यासाठी त्यात कूलिंग सिस्टीम देण्यात येते, तरीही सततच्या वापरामुळे अनेक वेळा मोबाईल जास्त गरम होतो.

ही समस्या सोडवण्यासाठी वन प्लसने लिक्विड कूलर सादर केला आहे. वन प्लसने मोबाईल शोमध्ये 11 कॉन्सेप्ट फोनही देखील सादर केला. यामध्ये कंपनीने लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजी दिली आहे. कंपनीने सादर केलेले गॅझेट कोणत्याही स्मार्ट फोनमध्ये वापरले जाऊ शकतेे आणि त्यामुळे तुमचा मोबाईल कूल ठेवू शकता. या लिक्विड कूलरचे वजन 75 ग्रॅम आहे, जे नेण्यास सोपे आहे. हा कूलर तुमच्या मोबाईल फोनचे तापमान 20 अंशांपर्यंत आणू शकतो. मोबाईल थंड करण्यासाठी तुम्हाला फक्त स्मार्ट फोनला डिव्हाइसच्या वर ठेवावे लागेल. याची किंमत किती असेल, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. सामान्य युजर्ससाठी हा पर्याय कधी उपलब्ध होईल याबाबतही माहिती समोर आलेली नाही. वन प्लसने 7 फेब—ुवारी रोजी क्लाऊड 11 इव्हेंटमध्ये त्यांचा प्रीमियम वन फ्लस-11 सीरिजअंतर्गत वन प्लस -11 आणि वन प्लस 11 आर हे दोन नवीन स्मार्ट फोन लाँच केले होते. वन प्लस -11 ची विक्री सुरू झाली आहे; परंतु वन फ्लस-11 ची विक्री अद्याप सुरू झालेली नाही.

गुगल टेकआऊट

गुगल हे सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन अनेक भन्नाट इस्टर एग्स किंवा गुप्त संज्ञा शोधत असते. अशातच गुगल फोटोजमध्ये आता अनलिमिटेड डेटा अपलोड करण्याची सुविधा कंपनीने आणली होती. त्याचे नाव गुगल टेकआऊट. ही एक अशी सेवा आहे, जी तुम्हाला तुमच्या गुगल खात्यातील एकाधिक अ‍ॅप्स डेटा निवडण्याची परवानगी देते. यामध्ये तुम्ही गुगल ड्राईव्हच्या फाईल्स, कॉन्टॅक्टस्, यू ट्यूब व्हिडीओ आणि मुख्य म्हणजे गुगल फोटोजमधून तुमचे सर्व फोटो डाऊनलोड आणि सेव्ह करू शकता. त्यामुळे त्याचा फायदा वापरकर्त्यांना होत आहे. तुम्हाला तुमचे गुगल अकाऊंट लॉग इन करावे लागेल. यानंतर तुम्हाला 'टेकआऊट.गुगल.कॉम'वर लॉग इन करावे लागेल. डिसिलेक्ट ऑल क्लिक करा. पाहिजे तो फोटो निवडा. तुम्हाला वर्षातून अथवा दोन महिन्यांनी एकदा एक्स्पोर्ट करण्यासाठी मुदत दिली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news