स्मार्ट फोनच्या विक्रीत घट | पुढारी

स्मार्ट फोनच्या विक्रीत घट

30,000 रुपयांवरील स्मार्ट फोनच्या विक्रीचा हिस्सा प्रथमच विक्रमी 35 टक्के
फाईव्ह जी स्मार्ट फोनच्या विक्रीचा हिस्सा 32 टक्के

सरलेल्या वर्षात (2022) जगभरात स्मार्ट फोनच्या विक्रीत घट झाल्याचे पाहायला मिळाले. या क्षेत्रातील ‘दादा देश’ म्हणजे भारत आणि चीन. काऊंटर पॉईंट मार्केट रिसर्चने सादर केलेल्या अहवालानुसार, भारतात गेल्या वर्षात स्मार्ट फोनच्या विक्रीत 9 टक्के घट झाली. हेच प्रमाण चीनमध्ये 14 टक्के आहे. चीनच्या तुलनेत भारताला कमी फटका बसला आहे. भारतात गेल्या वर्षभरात 15.2 कोटी स्मार्ट फोन विकले गेले. विशेष म्हणजे चीनमध्ये लागोपाठ पाचव्या वर्षी स्मार्ट फोनची विक्री घटली आहे. अपुरी मागणी आणि जागतिक मंदी हे यामागील कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Back to top button