113 Year Old Church Shifted | 113 वर्षे जुने चर्च जसेच्या तसे हलवले!

ऐतिहासिक वास्तू या त्या त्या देशांचा एक समृद्ध वारसा असतो. त्यांचे जतन करणे, हे त्या देशातील सरकारचे नाही, तर त्या देशातील नागरिकांचे आद्यकर्तव्यच असते.
113 Year Old Church Shifted
113 वर्षे जुने चर्च जसेच्या तसे हलवले!(Pudhari File Photo)
Published on
Updated on

युवराज इंगवले

ऐतिहासिक वास्तू या त्या त्या देशांचा एक समृद्ध वारसा असतो. त्यांचे जतन करणे, हे त्या देशातील सरकारचे नाही, तर त्या देशातील नागरिकांचे आद्यकर्तव्यच असते. या वास्तू प्रत्येक देशाचा इतिहासच जगासमोर मांडत असतात. अशीच एक स्वीडनमधील वास्तू अर्थात चर्च अन्य ठिकाणी हलवला. स्वीडनच्या उत्तरेकडील किरुना शहरात एक अविश्वसनीय द़ृश्य पाहायला मिळाले. खाणकामामुळे खचणार्‍या जमिनीपासून वाचवण्यासाठी, सुमारे 113 वर्षे जुने आणि 672 टन वजनाचे एक भव्य लाकडी चर्च जसेच्या तसे उचलून दुसर्‍या ठिकाणी नेले. हा 5 किलोमीटरचा प्रवास म्हणजे केवळ एक अभियांत्रिकी चमत्कार नव्हता, तर स्थानिक नागरिकांसाठी एक भावनिक क्षण होता. ज्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो लोक रस्त्याच्या दुतर्फा जमले. 1912 मध्ये बांधलेले हे लाल रंगाचे भव्य चर्च, किरुनाच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग होता. मात्र, शंभर वर्षांहून अधिक काळ चाललेल्या लोहखनिजाच्या खाणकामामुळे शहराच्या जुन्या केंद्राखालील जमिनीला भेगा पडण्याचा धोका निर्माण झाल्याने, त्यामुळे शहरच हळूहळू नवीन ठिकाणी वसविण्यात येत असून, या चर्चचे स्थलांतर हा या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा होता. प्रार्थना संपताच, भव्य ट्रेलरच्या इंजिनांचा गडगडाट सुरू झाला आणि महाकाय चर्चने हळूहळू जागा सोडली.

ताशी केवळ 500 मीटरच्या वेगाने झालेला हा प्रवास पूर्ण होण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागला. जमलेल्या लोकांनी श्वास रोखून हा क्षण अनुभवला. सुरक्षा कठडे असूनही, चर्च इतक्या जवळून जात होते की जणू हात लांबवून त्याला स्पर्श करता येईल, असे अनेकांनी सांगितले. केवळ किरुना अथवा स्वीडनमधूनच नाही, तर जगभरातून लोक जमले होते. जणूकाही डोळ्यांदेखत इतिहास घडत आहे. हे चर्च जसेच्या तसे हलवणे, हे एक मोठे अभियांत्रिकी आव्हान होते. ही एक गुंतागुंतीची मोहीम होती, जिथे चुकीला वाव नव्हता. या चर्चची उंची 35 मीटर , रुंदी 40 मीटर , वजन 672 टन आहे. स्टीलच्या बीमवर आधार देऊन, सेल्फ-प्रोपेल्ड मॉड्युलर ट्रान्सपोर्टर्स नावाच्या विशेष ट्रेलरवर उचलून चर्चचे स्थलांतर झाले.

113 Year Old Church Shifted
Editorial : जी-20 आणि भारतीय शेती

चर्चच्या रुंदीमुळे रस्ता 24 मीटरपर्यंत रुंद करण्यात आला. तसेच रस्त्यातील विजेचे खांब, ट्रॅफिक सिग्नल आणि एक जुना पूलही हटवला. स्वीडनच्या राजघराण्यातील प्रिन्स युजेन यांनी बनवलेले वेदीवरील भव्य चित्र भिंतीवर चिकटवलेले असल्याने ते काढणे अशक्य होते. त्यामुळे ते चित्र आणि 1,000 पाईप्स असलेले ऑर्गन, दोन्ही गोष्टी चर्चमध्येच पूर्णपणे सुरक्षित करून हलवले. या चर्चसोबत लोकांच्या सुख-दुःखाच्या आठवणी जोडलेल्या आहेत. त्या आठवणींनाही सोबत घेऊन भविष्याकडे जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news