

नवी दिल्ली, ७ फेब्रुवारी, पुढारी वृत्तसेवा, राजधानी दिल्लीतील पूजाऱ्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. मौलवींना सरकारकडून दिल्या जाणाऱ्या वेतनाच्या धरतीवर पुजाऱ्यांना देखील वेतन देण्याची मागणी आंदोलकांनी केली. आंदोलक साधू-संतांनी यावेळी मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर सामुहिक हनुमान चालीसा पठण केले.
भाजप नेते करनैल सिंह यांनी पुजाऱ्यांच्या मागणीचे समर्थन केले आहे. हिंदू बांधवांकडून दिल्या जाणाऱ्या करातून ज्याप्रमाणे मौलवींना वेतन दिले जाते. त्याचप्रमाणे पुजाऱ्यांना देखील मानधन दिले जावे,असे सिंह म्हणाले. भाजप खासदार प्रवेश साहिब सिंह यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.