व्यवसायाने डॉक्टर असलेल्या डॉ. संगीता बर्वे या उत्तम कवयित्री आणि बाललेखिका आहेत. 'मृगतृष्णा' आणि 'दिवसाच्या वाटेवरून' हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिध्द आहेत. बर्वे यांची बाल लेखिका म्हणूनही वेगळी ओळख आहे. 'गंमत झाली भारी', 'झाडआजोबा', 'खारुताई आणि सावली', 'उजेडाचा गाव' हे त्यांचे मुलांसाठीचे कवितासंग्रह असून 'पियूची वही' ही कांदबरी विशेष प्रसिद्ध आहे. याच कादंबरीवर आधारित 'संगीत पियूची वही' हे बाल नाटयही त्यांनी लिहीले आहे. 'अदितीची साहसी सफर' या पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केला आहे. यासोबतच, त्यांनी विविध विषयांवर ललित लेखनही केले आहे.