Rohit Sharma in World Cup : इंग्लंडविरुद्ध संयमी खेळी, हिटमॅन रोहितने केली विक्रमांची बरसात; सचिनलाही टाकले मागे

Rohit Sharma in World Cup
Rohit Sharma in World Cup
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या २९ व्या सामन्यात रविवारी (दि.29) एक विक्रम आपल्या नावावर केला. लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध 31 धावा केल्यानंतर, त्याने यावर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1,000 धावा पूर्ण केल्या आहेत. या वर्षात अशी कामगिरी करणारा तो एकूण तिसरा आणि दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहितने 22 एकदिवसीय सामन्यांच्या 21 डावांमध्ये 1000 धावा केल्या. (Rohit Sharma in World Cup)

2023 मध्ये 1000 वनडे धावा करणारा पहिला कर्णधार

रोहितने यावर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करून एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. 2023 मध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही कर्णधाराला हा टप्पा गाठता आलेला नाही. रोहित शिवाय कोणी केल्या १ हजार धावा  पूर्ण  या वर्षाच्या सुरुवातीला केवळ दोनच फलंदाजांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 हून अधिक धावा केल्या होत्या. (Rohit Sharma in World Cup)

भारताचा सलामीवीर शुभमन गिल या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. आजपर्यंत गिलने 23 एकदिवसीय सामन्यांमध्ये 66.25 च्या सरासरीने 1,325 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 6 अर्धशतके आणि 5 शतके झळकावली. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पथुम निसांका आहे, ज्याने यावर्षी आतापर्यंत 25 एकदिवसीय सामन्यांमध्ये 48.27 च्या सरासरीने आणि 87.62 च्या स्ट्राइक रेटने 1,062 धावा केल्या आहेत.

रोहितने पाचव्यांदा केला हा विक्रम नावावर (Rohit Sharma in World Cup)

रोहितने कारकिर्दीत एका कॅलेंडर वर्षात पाचव्यांदा 1000 वनडे धावा पूर्ण केल्या. त्याने पहिल्यांदा 2013 मध्ये (1,196 धावा) ही कामगिरी केली होती. त्यानंतर 2017 मध्ये 1,293 धावा, 2018 मध्ये 1,030 धावा आणि 2019 मध्ये 1,490 धावा केल्या. 2019 मध्ये त्याने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 5 शतके झळकावून धावांचा डोंगर उभा केला. यावेळीही त्याची बॅट जोरात बोलत आहे.

विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू (Rohit Sharma in World Cup)

या खेळीदरम्यान रोहितने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. तो ICC ODI आणि T-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला आहे. त्याच्याकडे आता 2,285 हून अधिक धावा आहेत. त्याने या बाबतीत सचिन तेंडुलकरला (2,278) मागे टाकले आहे. या बाबतीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विश्वचषकात त्याच्या नावावर 2,525 धावा आहेत. (Rohit Sharma in World Cup)

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news