४०० कंपन्यांचा मालक रिचर्ड ब्रान्सन!

४०० कंपन्यांचा मालक रिचर्ड ब्रान्सन!
Published on
Updated on

वयाच्या 17 वर्षी अंतराळात सफर करणारे विक्रमवीर सर रिचर्ड ब्रान्सन यांनी 11 जुलै 2021 मध्ये जगाला अचंबित केले. व्हर्जिन गॅलेक्टिक या त्यांच्या स्पेसलाईट कंपनीच्या उपकक्षीय उड्डाणाची चाचणी त्यांनी स्वतःच करायचे ठरवले. हे अंतर होते 86 कि.मी. रिचर्ड हे 400 कंपन्यांचे मालक आहेत. 2007 मध्ये 'फोर्ब्स' या मासिकाने जगातील 100 प्रभावशाली लोकांमध्ये ब्रान्सन यांचाही गौरव केलेला. हा महान उद्योगपती 12 डिसेंबर 2019 रोजी अचानक 'मातोश्री'वर आला.

जगातील पहिली आणि सर्वात वेगवान मुंबई-पुणे हायपरलूप रेल्वेलाईन उभारण्याचा निर्णय ऑगस्ट 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने घेतला होता. मुंबई -पुणे या दोन महानगरांतील 200 कि.मी.चे अंतर अवघ्या 25 मिनिटांत गाठणारा हा अल्ट्रामॉडर्न प्रकल्प अतिमहत्त्वाकांक्षी असाच होता; पण पहाटे आलेले सरकार अचानक कोसळले आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यानंतर उद्धव यांनी फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेण्याचा सपाटा सुरू केला. या निर्णयात एक हजार कोटींच्या मुंबई-पुणे हायस्पीड हायपरलूप कॅप्सूल रेल्वेलाईनचाही समावेश होता. उद्धव यांच्या प्रकल्प फेरआढाव्याची खबर लंडनला रिचर्ड यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांनी थेट 'मातोश्री' गाठली. रिचर्ड यांनी उद्धव यांना स्पष्ट शब्दांत विचारले, तुम्ही आमच्या व्हर्जिन हायपरलूप वन कंपनीकडून हा प्रोजेक्ट करणार की कसे? यावर उद्धव यांनी व्हर्जिनकडूनच प्रकल्प करण्याची हमी दिली. रिचर्ड यांनीही भारतीयांना उद्यमशीलतेचे कौतुक ठाकरे यांच्या समक्ष केले.

कोणतेही इप्सित अथवा ध्येय साध्य करण्यासाठी वयाचे मुळीच बंधन नसते. वयाच्या 16 व्या वर्षी लंडनच्या शाळेत शिकत असतानाच रिचर्ड यांनी 'स्टुडंट' मॅगझिन काढले आणि ते रस्त्यावर विकू लागले. या वयात उद्योजक-व्यावसायिकांना आपल्या मासिकात जाहिराती घेण्यासाठी पत्रे लिहू लागला. याच वयात जाहिरातीपोटी रिचर्ड यांना पहिल्यांदाच 250 युरो डॉलर मिळाले आणि इथून पुढे त्यांच्या कर्तबगारीला धुमारे फुटले. रिचर्ड यांनी ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमधील 74 एकरांत विस्तारलेले नेकर नावाचे खासगी बेट विकत घेतले आहे. हे बेट म्हणजे जणू कॅरेबियन समुद्रातील नंदनवनच? जगातील कोणतीही व्यक्ती या बेटावरील शाही रिसॉर्टमध्ये सुटीचा आनंद घेऊ शकते.

अमृतमहोत्सवी वर्षात वाटचाल करणार्‍या वयाच्या 74 व्या वर्षातही व्हर्जिन समूहाच्या 400 कंपन्या ते यशस्वीपणे चालवत आहेत. त्यांची वैयक्तिक संपत्ती 3 हजार कोटींपेक्षा अधिक आहे. त्यांना 16 व्या वर्षी पहिले घवघवीत यश मिळाले तेव्हा त्यांनी एकच मंत्र आणि तंत्र अवलंबिला -'डउठएथ खढ, ङएढ'ड ऊज खढ.' म्हणजे, तुमच्या मनात काहीतरी वेगळे करण्याचा विचार आला, तर तुम्ही वेळ दवडू नका! पक्का निर्धार करा आणि ते ध्येय गाठूनच विश्रांती घ्या! रिचर्ड यांच्या या वृत्तीमुळेच संपूर्ण व्हर्जिन समूहाच्या कर्मचार्‍यांनी त्यांना ऊी. धशी ही पदवी बहाल केली आहे.

'स्टुडंट' मासिकाच्या घवघवीत यशानंतर ब्रान्सन यांनी शाळा सोडली आणि 1971 मध्ये त्यांनी ब्रिटिश बूक स्टोअर आणि डिसकाऊंट रेकॉर्ड शॉप सुरू केले. 1973 मध्ये त्यांनी व्हर्जिन रेकॉर्ड ही कंपनी सुरू केली. त्यानंतर 1984 मध्ये व्हर्जिन अटलांटिक एअरवेज ही प्रवासी विमान कंपनी सुरू केली. या माणसाला अंतराळही खुणावू लागले. अंतराळ पर्यटनाची भन्नाट कल्पना त्यांना सुचली आणि त्यांनी 2004 मध्ये सुरू आणखी एक कंपनी. तिचे नाव व्हर्जिन गॅलॅक्टिक. या कंपनीच्या सबऑर्बिटल पॅसेंजर फ्लाईटस् अंतराळात झेपावू लागल्या तशी रिच ब्रान्सन या नावाला प्रसिद्धी मिळू लागली. यानंतर रिचर्ड यांनी मागे वळून पाहिलेच नाही. 2006 मध्ये मध्ये व्हर्जिन मोबाईल, वायरलेस फोन सेवा आणि अशा कित्येक सेवा सुरू केल्या. रिचर्ड यांच्या 40 कंपन्या 13 देशांत कार्यरत आहेत. यात भारताचाही समावेश आहे. यशाचा सोपा मंत्र सांगताना रिचर्ड म्हणतात, ध्येयपूर्ती करताना तुम्हाला हजारो मैलांचा प्रवास करावा लागेल; पण त्याची सुरुवात पहिल्या पावलापासून होते. हे पहिले पाऊल पुढे टाकण्यासाठी घाबरू नका! एकदा ध्येय निश्चित केले, तर ते साध्य करणार्‍या वाटेत कितीही काटे असू देत, तुम्हाला परावृत्त करणार्‍या व्यक्तींचा कितीही कडवा विरोध असू दे, त्यांचा बिमोड करण्यासाठी हे पहिले पाऊल टाका.  If you don't make the effort, you won't reach your goal.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news