

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यभरात असलेल्या राज्यातील व्याघ्र प्रकल्पामध्ये व लगतच्या क्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या वाघांच्या शिकारीबाबत भारत सरकारच्या वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोतर्फे वाघांच्या शिकारीबाबत रेड अलर्ट घोषित केला आहे. राज्यभरातील सर्व व्याघ्र प्रकल्पातील प्रकल्प संचालक व बाह्य त्यातील अधिकाऱ्यांना खबरदारी म्हणून तातडीने उपाय योजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यभरातील वन विभागाचे अधिकारी ॲक्शन मोडवर आहेत
भारत सरकारच्या वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्यभरातील व्याघ्र प्रकल्प व बाह्य क्षेत्रातील जंगलात वाघाच्या शिकारी होऊ शकतात असा इशारा देण्यात आला आहे. हा गंभीर धोका लक्षात घेता राज्यभरात व्याघ्र प्रकल्पासह बाह्य क्षेत्रात रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. याबाबत 29 जून 2023 ला राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्पाचे संचालक व बाह्य क्षेत्रातील अधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे धोक्याचा इशारा देत रेड अलर्ट घोषित करून राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
हे राज्यातील विविध व्याघ्र प्रकल्पांच्या आसपास विशेषतः सातपुडा येथे संघटित शिकारी टोळ्या सक्रिय दिसत आहेत. ताडोबा, पेंच, कार्बेट, अमनगड. पिलीभीत, वाल्मिकी, राजाजी, आणि बालाघाट, गडचिरोली, चंद्रपूर यांसारखे व्याघ्रप्रधान क्षेत्र. सर्व व्याघ्र प्रकल्पांचे क्षेत्र संचालक आणि संबंधित अधिकाऱ्यानी तातडीने गस्त वाढविन्याच्या सूचना दिल्या आहे. संवेदनशील भागांना भेट देणे, तंबू, मंदिरे, रेल्वे स्थानक, बसस्थानक, पडक्या इमारती, सार्वजनिक निवारा आदी ठिकाणी संशयित भटक्या लोकांचा शोध घेन्याकरिता कळविण्यात आले आहे. तसेच सर्व पोलिस ठाण्यात या धोक्याच्या इशाराबाबत कळविण्याचे सूचना आहेत.
व्याघ्र प्रकल्प व प्रकल्प लगतच्या बाह्य क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाय योजना करून वाघांच्या शिकारी रोखण्याबाबत अतिरिक्त संचालक एच. व्ही. गिरीशा, यांनी निर्देश दिले आहेत.
राज्यासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी भारत सरकारच्या वन्यजीव अपराध नियंत्रण ब्यूरो ने धोक्याचा इशारा दिल्यानंतर सक्रीय झाले आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये ताडोबा सील ची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये 3 वन परीक्षेत्राधिकारी, 3 गार्ड आणि 2 राउंड ऑफिसर यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीचे प्रमुख आयएफएस अधिकारी आहेत. ही समिती संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यावर वाघांच्या शिकारी रोखण्यावर विशेष लक्ष घेऊन जाणार आहे. गाव स्तरावर गावातील स्वयंसेवकांच्या समावेश असलेले प्राथमिक कृती दिन यांना सूचना देण्यात आलेली आहे त्यांच्या माध्यमातून गावागावात रेकी करणे अनोळखी व्यक्ती आणि संशयित व्यक्तींचा मागवा घेणे नवीन झोपड्या कुठे निर्माण झाल्यास त्या ठिकाणी वास्तव्यास करणाऱ्या लोकांची माहिती घेणे स्थलांतरित लोकांवरती नजर ठेवणे आधी का मी या दलाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत क्षेत्रीय कर्मचारी वापर आणि पोर झोन मध्ये 24 तासही अलर्ट वर आहेत दोन्ही ठिकाणी अधिकाऱ्यांनी गस्त वाढवलेले आहेत प्राथमिक कृती दलांची 40 टीम कार्यरत असून तेही विशेष पाण्यात ठेवून आहेत.