बजाज फायनान्स (Bajaj Finance) कंपनीने रिझव्र्ह बँकेच्या डिजिटल कर्ज मार्गदर्शक तत्त्वांच्या तरतुदींचे पालन केले नाही, त्यामुळे रिझव्र्ह बँकेकडुन ही कारवाई करण्यात आली आहे. बजाज फायनान्सने 'ई कामर्स' आणि 'इन्स्टा ईएमआय कार्ड'या दोन कर्ज देणाऱ्या उत्पादनांतर्गत कर्जदारांना मुख्य माहिती असलेले विधाने जारी न करणे तसेच कंपनीने मंजूर केलेल्या इतर डिजिटल कर्जांच्या संदर्भात जारी केलेली माहिती यामध्ये असलेली कमतरता यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. दरम्यान, कंपनीने या उणीवा सुधारल्यानंतर रिझव्र्ह बँकेचे समाधान झाल्यास या निर्बंधांचे पुनरावलोकन केले जाईल, असेही रिझव्र्ह बँकेने म्हटले आहे. १५ नोव्हेंबरला यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक काढत माहिती दिली आहे.