

पुढारी ऑनलाईन डेस्क: मुंबईत आज ( दि. १७) मार्च शिवाजी पार्कवर 'इंडिया' आघाडीच्या सभेपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले.
शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची आज सभा पार पडत आहे. या सभेच्या निमित्ताने इंडिया आघाडीच्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ मुंबईतून फुटणार आहे. इंडिया आघाडीच्या सभेसाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.