Pune municipal election : महापालिका निवडणूक लांबणीवर पडण्याची जोरदार चर्चा

pune municipal
pune municipal
Published on
Updated on

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : आगामी महापालिका निवडणुका लांबणीवर पडणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गत महापालिका निवडणुकीसाठी बरोबर पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 11 जानेवारीला 2017 पासून आचारसंहिता लागू झाली होती. आता मात्र आगामी निवडणुकीसाठी अद्याप प्रारूप प्रभाग रचनाही निश्चित होऊ शकलेली नाही. त्यामुळे या निवडणुका लांबणीवर पडण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. (Pune municipal election)

महापालिकेच्या विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ येत्या 15 मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच निवडणूक होऊन नविन महापौर निवड होणे अपेक्षित आहे. त्यासाठी किमान फेब्रुवारी अखेर पर्यंत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे.

2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीसाठी बरोबर 12 जानेवारीला आचारसंहिता लागू झाली होती तर 21 फेब्रुवारीला मतदान आणि 23 ला प्रत्यक्षात मतमोजणी असा कार्यक्रम होता.

Pune municipal election : प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीची प्रक्रिया होऊनही विलंब

विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेस 23 ऑक्टोबर 2016 ला राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी मिळाली होती. त्यानंतर 10 नोव्हेंबरला ही प्रभाग जाहीर झाली होती. त्याचबरोबर 7 नोव्हेंबर ला आरक्षण सोडतही निघाली होती. म्हणजेच पालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्या आधी दोन महिने प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती.

आता मात्र आगामी पालिका निवडणुकीसाठी ही सर्व प्रक्रिया रेंगाळली आहे. नगरसेवकांची आणि पालिकेची पंचवार्षिक मूदत संपण्यास अवघा दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. असे असताना अद्याप पालिकेची प्रारूप प्रभाग रचना तयार झालेली नाही.

महिन्याभरानंतर घडामोडींना वेग लागणार

यासंबंधीची प्रक्रिया अद्याप सुरू असून प्रारूप प्रभाग निश्चित झाल्यानंतरच ते जाहीर होणार असून त्यानंतर हरकती- सूचनाची प्रक्रिया पुर्ण होऊन अंतिम प्रभाग रचना निश्चित होणार आहे. त्याच बरोबर मागासवर्ग प्रवर्ग आणि महिला आरक्षण याचीही सोडत काढावी लागणार आहे.

या सर्व प्रकिया पूर्ण करण्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यानंतरच पालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होऊ शकणार आहे.

मात्र प्रभाग रचनेपासून आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमापर्यंत एकूण सर्वच झालेला विलंब लक्षात घेता पालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. साधारणपणे एप्रिल ते मे महिन्यात पालिकेची निवडणूक होईल अशी चर्चा राजकिय वर्तुळात आहे. मात्र, प्रशासनाकडून याबाबत अद्याप तरी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news