

पुढारी ऑनलाईन डेस्क : बेळगाव येथे एका महिलेला नग्न करून मारहाण केल्याची ध्क्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी राज्य सरकारचा निषेध करणाऱ्या भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांना आणि पक्षाच्या नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी आज (दि.१६) ताब्यात घेतले.
११ डिसेंबर रोजी बेळगाव जिल्ह्यातील वंतामुरी गावात एका महिलेवर हल्ला करण्यात आला होता. तिला नग्न करून विजेच्या खांबाला बांधून ठेवले होते. या प्रकरणाच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढला होता.
भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री डीव्ही सदानंद गौडा म्हणाले की, कर्नाटकमध्ये महिलांना सुरक्षितता नाही. आम्ही कर्नाटकातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या विरोधात आंदोलन करत आहोत.
हेही वाचा