

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी रात्री उशिरा भेट घेतली असून या भेटीदरम्यान खातेवाटपाबाबत चर्चा झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
अर्थ, अन्न आणि प्रशासन खाते राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. भिवंडीची सभा संपवून फडणवीस यांनी शिंदे यांची भेट घेतली. भिवंडीत भाजपचा तर ठाण्यात टीप टॉप प्लाझा या ठिकाणी शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.मेळाव्यानंतर दोन्ही नेत्यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर ही बैठक घेतली असून उद्याच खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अर्धा तास ही चर्चा सुरु होती.