दोन भावंडांना संपवणार्‍या बिहारी बाबूला अटक

file photo
file photo
Published on
Updated on

पालघर : पुढारी वृत्तसेवा : बोईसरपासून जवळच असलेल्या कुडण येथे एका व्यक्तीने दोघांचा खून करून लपून बसला असता पोलिसांनी जिवाची बाजी लावत संशयित हत्यार्‍याला अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलीस कोठडी मिळवली, असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. मात्र, या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली असून अशा व्यक्तींची पोलिसांनी तत्काळ चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या 

मोठे कुडण गावात चिकूच्या वाडीत देखभाल करण्यासाठी गेलेला आपला भाऊ येत का नाही, हे पाहण्यासाठी गेलेल्या भावाला नंतर आणि चिकूच्या वाडीत गेलेल्याला आधी संपवल्याची घटना नुकतीच कुडण येथे घडली. मुकुंद विठोबा पाटील (92) आणि भीमराव विठोबा पाटील (84) अशी या दोन्ही वृद्ध भावांची नावे आहेत. बोईसर शिवाजीनगर येथे राहणार्‍या (मूळ गाव शब्दा, पोठीया, कटीहार, बिहार) किशोर कुमार जगनाथ मंडल याने आपल्याकडील लोखंडी कुदळीने दोन्ही मृत्युमुखी पडलेल्या वृद्धांवर अमानुषपणे प्रहार करून त्यांचा जीव घेतला आणि मोठ्या प्रमाणात चिखल असलेल्या तलावात तो आपल्या बचावासाठी उतरला. तत्पूर्वी त्याने तिसरा जीवही घेतला असता एवढ्यात जीवाची पर्वा न करता त्याच्याकडून ती कुदळ हिसकावून घेण्यात यश आले.

किशोरकुमार हा एका कंपनीत कायमस्वरूपी नोकरी करत असून गेल्या काही महिन्यांपूर्वी घरात कौटुंबिक वाद झाले होते. त्यानंतर त्याने घर सोडले होते. घटना घडली त्याच्या दोन दिवस आधी किशोरकुमार हा मुकुंद पाटील यांच्या चिकूच्या बागेत येऊन विश्रांती घेत होता. त्यावेळी पाटील यांनी त्याला तिथून हुसकावून लावले होते. मात्र, त्यानंतरही तो तिथे आल्यानंतर त्यांनी त्याला तिथे थांबण्यास पुन्हा मज्जाव केला. त्यावेळी मुकुंद तिथे एकटेच होते. या संधीचा फायदा उठवून किशोरकुमार याने त्यांच्यावर लोखंडी कुदळीने अमानुषपणे हल्ला करून त्यांचा जीव घेतला.

आपला भाऊ येत का नाही हे पाहण्यासाठी गेलेल्या भीमराव पाटील यांच्यावरही त्याने तसाच हल्ला करीत तेही मृत्युमुखी पडले. तिथून पुढे तो त्यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला असता त्याच्याकडून ती कुदळ हस्तगत करण्याचा प्रयत्न केला असता त्या झटापटीत किशोरकुमार त्यांच्या हातातून निसटला. तो कुठे पळाला याची माहिती मिळाली नसल्याने पोलिसांशी संपर्क करण्यात आला आणि शोधकार्य सुरू केले. काही वेळाने तो एका चिखलग्रस्त भागात लपून बसण्याचा प्रयत्न करताना त्याला ताब्यात घेण्यात आले.

त्यावेळी त्याच्या पोटातून अडीच लिटर चिखलग्रस्त पाणी काढण्यात आले. लागलीच त्याच्यावर उपचार करून त्याची झडती घेतली असता, तो बोईसर मधील एका नामांकित कंपनीत नोकरीस असल्याचे सांगितले. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि उपविभागीय अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news