Zika Virus | एनआयव्हीमध्ये देशभरातून झिकाचे 106 नमुने

संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवण्यात आले
A Zika outbreak is emerging in the city
शहरात झिकाचा प्रादुर्भाव दिसून येत आहेFile Photo

पुणे : सध्या शहरात झिकाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेमध्ये (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. सध्या एनआयव्हीकडे देशभरातून 106 नमुने तपासणीसाठी आले असून, त्यातील 86 महाराष्ट्रातील आणि इतर नमुने पंजाब, बिहार, बडोदा आणि सिल्व्हासा येथील आहेत, अशी माहिती एनआयव्हीचे संचालक डॉ. नवीन कुमार यांनी दिली.

A Zika outbreak is emerging in the city
Zika Virus| झिका रुग्णांच्या एक कि. मी. परिसरात फवारणी

एशियन लिनिएजचा विषाणू सौम्य

डॉ. नवीन कुमार म्हणाले, सध्या पुण्यात आढळून येणारा झिका विषाणूचा प्रकार एशियन लिनिएजचा असून, या स्वरूपाची लक्षणे अत्यंत सौम्य असतात. त्यामुळे सध्याच्या झिकाच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग केले जात आहे. यामध्ये व्हायरल लोड कमी प्रमाणात दिसून येत आहे. झिका नमुन्यांची तपासणी पीसीआर पद्धतीने केली जात आहे.

एनआयव्हीतर्फे (NIV) सर्व्हेलन्सबाबत सूचना

रक्ताच्या नमुन्याच्या तपासणीमधून एकाच वेळी डेंग्यू, चिकनगुनिया आणि झिकाचे निदान करता येते. एनआयव्हीमध्ये सध्या एका दिवशी 50 नमुन्यांची तपासणी करता येणे शक्य आहे. झिकाच्या प्रादुर्भावाबाबत सोमवारी केंद्र शासन, एनआयव्ही, सार्वजनिक आरोग्य विभाग, महापालिका यांची ऑनलाईन बैठक पार पडली. या वेळी एनआयव्हीतर्फे सर्व्हेलन्सबाबत सूचना करण्यात आल्या आणि उपाययोजनांवरही चर्चा झाली.

झिका विषाणूच्या प्रादुर्भावातील जोखीम सध्या मोठी नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. आत्तापर्यंत पुण्यातील आठ रुग्णांच्या रक्तनमुन्यांची तपासणी झाली आहे. त्यापैकी सहा रुग्णांच्या नमुन्यांच्या सिक्वेन्सिंमध्ये व्हायरस दिसून आलेला नाही. इतर दोघांच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये व्हायरल लोड दिसून आला आहे. यापैकी कोणाचीही परिस्थिती गंभीर नाही.

डॉ. नवीन कुमार, संचालक, एनआयव्ही

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news