Pimpari News| तिसऱ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

बांधकाम साइटवर काम करताना तिसऱ्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला.
Pimpari News|
Pimpari News| File Photo
Published on
Updated on

पिंपरी : बांधकाम साइटवर काम करताना तिसऱ्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १८) दुपारी वाल- हेकरवाडी चिंचवड येथे घडली. भगुताराम शंकरलाल बडजातीया (वय २९) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी बाबू नागनाथ गायकवाड (रा. निगडी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pimpari News)

त्यानुसार जागा मालक तौसीफ महंमद शरीफ बांगी, बांधकाम ठेकेदार परशुराम लेखाराम मेवा आणि बांधकामाचा कंत्राटदार असिफ इकबाल शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौसीफ बांगी याच्या जागेमध्ये सुरू असलेल्या बांधकामावर फिर्यादी गायकवाड यांचा सहकारी भगुताराम हा मित्री काम करत होता. आरोपींनी त्याला कोणतीही सुरक्षेची साधने दिली नाहीत. दरम्यान काम करत असताना तिसर्या मजल्यावरून पडून भगुताराम याचा मृत्यू झाला.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत. शहरातील अनेक बांधकाम साईडवर काम करीत असलेल्या कामगारांना ठेकेदार सुरक्षा पुरवित नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे तर अनेकांना गंभिर दुखापत होत आहे.

निगडी येथील गंगानगर येथे बांधकाम सुरू असलेल्या ईमारतीच्या लिफ्टच्या डकमधून पडल्याने एका कामगाराचा पाय मोडला असून, त्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना ताजी असतानाच चिंचवडमध्ये हि दुसरी दुर्घटना घडली. बांधकाम साईडवरील कामगारांना सुविधा मिळत आहेत की नाही, याबाबत महापालिका तसेच राज्यशासनाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने दिसून येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news