अहो साहेब, पैशाशिवाय इथं कामंच होत नाहीत

निगडी येथील शिधापत्रिका कार्यालयात एजेंटचा सुळसुळाट
Citizens who came to the ration office at Nigdi
निगडी येथील शिधापत्रिका कार्यालयात आलेले नागरिक पुढारी
Published on
Updated on

नवी सांगवी : निगडी येथील शिधापत्रिका कार्यालयाच्या तळमजल्यावर एजंटाचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. येथील एका हॉटेलच्या टेबल-खुर्च्या काबीज करून नागरिकांना धीर देत काय काम आहे.., काय झालं.., या इकडे.., मी आहे ना.., करतो तुमचे काम अशा तर्‍हेने येथे येणार्‍या नागरिकांशी संवाद साधताना एजेंट दिसतात.

एजंटांना खतपाणी कोण घालतं?

सोमवारी (दि. 15) दुपारी तीन वाजताची वेळ. बोला आता काय करू मदत तुम्हाला.., काय करायचे आहे. रेशनिंग कार्ड काढायचे आहे? असेल तर तीन हजार रुपये मी घेतो. अन्नधान्य सुरू करण्यासाठी चार हजार रुपये लागतील. इतर ठिकाणी पाच हजार, चार हजार रुपये सांगतात. मी प्रामाणिकपणे सांगतो. अहो साहेब, पैशाशिवाय इथे कामेच होत नाहीत! काय सांगायचं तुम्हाला.. पैसे दिले तरी कमीत कमी दीड महिना लागणार. आज सर्व्हर डाऊन आहे. उद्या चालू झाला तर लगेच रजिस्ट्रेशन करून परुव्हड करून प्रिंट मिळेल. मात्र, दीड महिन्यानंतरच ऑनलाईन वेबसाईटवर आधारनंबर टाकताच आपणास शिधापत्रिका प्रिंट काढून मिळेल. त्यावर शिधापत्रकधारकाने स्वतः वरती कार्यालयात असणार्‍या साहेबांकडे जाऊन सही शिक्का प्रिंटवर घ्यावा लागतो. आम्हाला अधिकारी देत नाहीत सही शिक्का, असे संभाषण निगडी येथील शिधापत्रिका कार्यालयात दररोज एकायला मिळते.

Citizens who came to the ration office at Nigdi
पिंपरीः शिधापत्रिका कार्यालयांच्या मनुष्यबळात कपात

शिधापत्रिका काढण्यासाठी नागरिकांची गर्दी

निगडी येथील शिधापत्रिका कार्यालयात सकाळपासूनच शिधापत्रिका नूतनीकरण, नावे कमी करणे, नवीन नाव दाखल करणे, उत्पन्न बदल करणे, पत्ता बदलणे, धान्य दुकानदार बदलणे आदी कामासाठी गर्दी असते. मात्र, येथे गेल्यावर सर्वसामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कार्यालायत केवळ एकाच कामासाठी वारंवार चकरा मारूनही काम झाले नाही, तर नाइलाजास्तव नागरिकांना एजंटचे सहाय्य घ्यावे लागते. त्यामुळे सरकारी यंत्रणाच या एजंटांना खतपाणी घालतात की काय? असा नागरिकांचा प्रश्न उद्भवत आहे.

एजेंटशी झालेला संवाद

एजंट : या इकडे, बसा खुर्चीवर

नागरिक : इतके हेलपाटे मारूनही माझे काम होत नाहीये.

एजंट : काय झाले सांगा, दाखवा पेपर, शिधापत्रिकामधील नावांचे फोटो, लाईट बिल, आधारकार्ड झेरॉक्स, पॅनकार्ड, गॅसच्या पुस्तकाची झेरॉक्स आणून द्या. मला मी लगेच काम करून देतो.

नागरिक : किती घेणार पैसे तुम्ही या कामाचे

एजंट : रेशनिंग कार्डसाठी तीन हजार अन्न धान्य सुरू करण्यासाठी चार हजार घेईल.

नागरिक : अहो एवढे पैसे.. खूप होतात हो. जरा काही तरी कमी करा.

एजंट : अहो साहेब, इथं पैशाशिवाय कामंच होत नाहीत. इतर ठिकाणी चार हजार पाच हजार घेतात.

ती सगळी फसवेगिरी आहे. आम्ही एजेंटना कार्यालयाची पायरीदेखील चढू देत नाही. यापूर्वी त्यांना समज दिली आहे. मात्र, ते पब्लिक स्पेस आहे असे म्हणतात. त्यामुळे काही बोलता येत नाही. इथे येणार्‍या नागरिकांना आम्ही सर्व माहिती व्यवस्थित देत असतो. ऑनलाईन फार्म कसे भरायचे याबाबतही मदत करतो.

अमोल हाडे, ए झोन अधिकारी, शिधापत्रिका कार्यालय, निगडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news