आर्थिक परिस्थितीला कंटाळून मेट्रो स्थानकावरून उडी मारून तरुणाने संपवलं आयुष्य

या प्रकाराने अनेकांना हादरवून सोडले आहे
Pune News
आर्थिक परिस्थितीला कंटाळून मेट्रो स्थानकावरून उडी मारून तरुणाने संपवलं आयुष्यFile Photo
Published on
Updated on

पिंपरी: घरच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून एका 21 वर्षीय तरुणाने मेट्रो स्थानकावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. 24) सायंकाळी 6 वाजता संत तुकारामनगर येथे घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, स्थानकावरील नागरिकांसमोरच घडलेल्या या प्रकाराने अनेकांना हादरवून सोडले आहे.

सुजल संजय मनकर (21, रा. राजगुरुनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुजल बीसीएसच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती, त्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सोमवारी संध्याकाळी सुजलने संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला. काही वेळ तो तिथे एकटाच उभा राहून विचार करत होता. अचानक त्याने थेट खाली रस्त्यावर झेप घेतली. दुर्दैवाने, खाली पडताच एका भरधाव वाहनाने त्याला चिरडले.

आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी

सुजलने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत त्याने घरच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news