पिंपरी : हातात पिस्तुल घेवून 'रिल्स' बनवणाऱ्यांना अटक

खंडणी विरोधी पथकाने केली कारवाई
Those making 'reels' with pistols in their hands were arrested
हातात पिस्तुल घेवून 'रिल्स' बनवणाऱ्यांना अटकCrime File Photo

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा : सोशल मिडियावर हातात पिस्तूल घेवून रिल्स बनवणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर, अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बुधवारी (दि. 17) चिखली येथे ही कारवाई केली. कुणाल रमेश साठे (वय.२६, रा. मोरेवस्ती, चिखली) आणि त्याचा अल्पवयीन साथीदार या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर, यश कांबळे (रा. टॉवर लाईन, चिखली), सुशील गोरे उर्फ बारक्या (रा. ओटास्कीम, निगडी) आणि रोहित मिश्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार आशिष बोटके यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Those making 'reels' with pistols in their hands were arrested
नागपूर : रिल्स बनविण्याच्या नादात उलटली कार; दोन युवक ठार, तीन गंभीर

पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेची पथके सराईत गुन्हेगारांच्या सोशल मीडियावर 'वॉच' ठेवून आहेत. दरम्यान, खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार आशिष बोटके यांना इन्स्टाग्रामवर हातात पिस्तुल घेऊन दहशत पसरवताना एक व्हिडीओ दिसला. त्यानुसार, पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान, पथकाला आरोपी मोरेवस्ती, चिखली येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता आरोपी कुणाल साठे याचे नाव समोर आले. पोलिसांनी कुणाल साठेलाही बेड्या ठोकल्या.

Those making 'reels' with pistols in their hands were arrested
रेल्वे पुलावर रिल्स बनविणे जीवावर बेतले!

आरोपी यश कांबळे हा दुचाकीवर पाठीमागे बसून पिस्तुल हातात घेऊन दहशत पसरवत असल्याचे आरोपींनी सांगितले. त्यांच्या पाठीमागे असलेल्या दुचाकीवरून हा व्हिडीओ बनवल्याची कबुली दोघांनी दिली. आरोपींवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Those making 'reels' with pistols in their hands were arrested
‘रिल्स’वेडाचे कटू सत्य

पोलीस ठाण्यातही बनवले रील्स

आरोपी रोहित मिश्रा याच्या इन्स्टाग्रामवर तब्बल ९० व्हिडिओ पोस्ट आहेत. २०१९ पासून तो सोशल मीडिया वापरत आहे. यामध्ये अनेक चित्रपटातील गुन्हेगारीचे संवाद वापरून रिल्स बनवण्यात आले आहेत. यातील विशेष बाब म्हणजे नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्याच्या एका खोलीतही एक रिल्स बनवला आहे. रिल्सला कॅप्शन देखील देण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news