Internatioanal Driving Permit: आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याचा टक्का वाढतोय; आरटीओ महसुलामध्ये वाढ

गेल्या पाच वर्षामध्ये यात वाढ होत आहे. त्याच प्रमाणे महसूलदेखील वाढला आहे.
Internatioanal Driving Permit
आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याचा टक्का वाढतोय; आरटीओ महसुलामध्ये वाढPudhari
Published on
Updated on

पंकज खोले

पिंपरी: नोकरीनिमित्ताने अथवा शिक्षणासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. तिथे गेल्यावरदेखील वाहन चालवण्याचा (ड्रायव्हिंग) मोह स्वस्थ बसू देत नाही. तेथे गेल्यानंतर वाहन परवान्यासाठी लागणारा खटाटोप होऊ नये, यासाठी इथूनच आयडीपी (आंतरराष्ट्रीय वाहन परवाना) काढून घेतात. गेल्या पाच वर्षामध्ये यात वाढ होत आहे. त्याच प्रमाणे महसूलदेखील वाढला आहे.

परदेशात जाताना, आंतरराष्ट्रीय वाहन परवाना (आयडीपी) मिळण्यासाठी अनेकजण अर्ज करतात; कोरोना, युद्धजन्य परिस्थिती आणि स्थानिक देशातील बदलणारे निर्णय या विविध कारणांनी अनेकांनी परदेशवारी थांबवली होती. त्यानंतर आता पुन्हा नोकरी, शिक्षण, पर्यटनासाठी जाणार्‍यांचा ओघ वाढला आहे. परिणामी ‘आयडीपी’ घेणार्‍यांची संख्या वाढत आहे. (Latest Pimpri News)

Internatioanal Driving Permit
Municipal Appeal: परिसरात पाणी साचू नये याची दक्षता घ्या; आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पालिकेचे आवाहन

आयटी, उद्योग आणि शैक्षणिक या तिन्हीही क्षेत्रात निमित्ताने जगाच्या पाठीवर विविध ठिकाणी जाणार्‍यांची संख्याही वाढली आहे. राज्यामध्ये मेक इन इंडिया मार्फत उद्योग वाढले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये निर्यातदेखील वाढली आहे. व्यवसायासाठी आणि तसेच आपला निर्यातदार शोधण्यासाठी अनेक उद्योजकांना परदेशामध्ये जावे लागते. त्याचप्रमाणे मुंबईप्रमाणेच पुणे येथूनही वेगवेगळ्या देशांमध्ये जाणार्‍या विमानांची उड्डाणे वाढली आहेत. त्यामुळे परदेशात गेल्यावर वाहन चालविण्याची गरज भासू शकते. विशिष्ट परवाना आवश्यक असतो.

वर्षभराचा परवाना

परदेशात गाडी चालवताना तुम्ही तुमचा आयडीपी आणि तुमचा देशांतर्गत वाहन परवाना दोन्ही सोबत बाळगणे आवश्यक आहे. आयडीपी मुदत सामान्यतः जारी केल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी वैध असते. व्हिसा, वाहन परवाना व पासपोर्टसह ऑनलाइन अर्ज करावा लागतो. त्याची वैधता संपल्यास पुन्हा नव्याने अर्ज करून त्याची एक हजार ते दीड हजार रुपये सरकारी फी जमा करावी लागते. त्यानंतर तो पुन्हा नव्याने मिळतो. त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच तो परवाना मिळतो.

Internatioanal Driving Permit
Pimpri Politics: शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का; राष्ट्रवादी काँग्रेसच्या 37 माजी नगरसेवकांची घरवापसी

पाच वर्षांनंतर प्रमाण वाढले

पाच वर्षांपूर्वी म्हणजेच साधारण 2018 ते 2020 या दरमान, वाहन परवाना संख्या अवघी 500 ते 600 इतकी होती. पुन्हा कोरोनामध्ये ती घटली. त्यानंतर गेल्या तीन वर्षात पुन्हा ही संख्या वाढली आहे. त्यात सन 2022- 23 यांमध्ये 1222, सन 2023- 24 मध्ये 1361 तर, 2024- 25 मध्ये 1361 आयडीपी देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news