Deepstambh 2024 | दिवाळीनिमित्त रसिकांसाठी साहित्य मेजवानी

दिवाळी अंकांच्या दुनियेत 'पुढारी'च्या दीपस्तंभने आघाडी घेतली आहे.
Pudhari Deepstambh 2024 Diwali Ank
Pudhari Deepstambh 2024 Diwali AnkPudhari Photo
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

दिवाळी म्हणजे आनंदोत्सव. या दीपोत्सवात चोखंदळ वाचक आणि रसिक प्रेक्षकांसाठी अनोख्या साहित्याची मेजवानी यंदा सर्वांना मिळणार आहे. दिवाळी अंकांच्या दुनियेत 'पुढारी'च्या दीपस्तंभने आघाडी घेतली आहे.

दर्जेदार साहित्याने तो नटला आहे. दिवाळीत मनोरंजनात्मक कार्यक्रमांवर शहरातील सांस्कृतिक संस्था आणि कलाकार मंडळींनी भर दिला आहे. ते पाहण्याची उत्सुकता रसिकांना लागली आहे.

दिवाळी पहाट कार्यक्रमांची रेलचेल

दिवाळीनिमित्त शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दिवाळी पहाटचे आयोजन केले जाते. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांनाही रसिक भरभरुन प्रतिसाद देतात. संगीत क्षेत्रातील मान्यवर मंडळींची उपस्थिती आणि त्यांच्या कलेचा प्रत्यक्ष अनुभव प्रेक्षकांना 'याची देही याची डोळा' पहायला मिळतो. यंदाही नामवंत कलाकारांचे कार्यक्रम मुख्य आकर्षण आहे.

दिवाळी सांज

शहरातील अनेक संस्थांनी यंदाही दिवाळी सांज कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सायंकाळी दिवे लाऊन मंद प्रकाशात कविता वाचन, कथा वाचन, अभिवाचन, भक्तिगीते अशा कार्यक्रमाचा आनंद रसिक प्रेक्षकांना घेता येणार आहे.

'दीपस्तंभ' मधील वाचनीय लेख

दिवाळीत विविध अंकांच्या माध्यमातून साहित्याची मेजवानी मिळत असते. दिवाळीच्या आनंदात भर घालणारे दिवाळी अंक स्टॉल्सवर दिसू लागले आहेत. त्यात 'पुढारी'ने यंदा प्रसिध्द केलेल्या 'दीपस्तंभ' दिवाळी अंकातही वास्तवावर प्रकाश टाकणारे दर्जेदार लेख, आकर्षक मांडणी आणि उत्कृष्ट छपाईची परंपरा 'पुढारी'च्या दीपस्तंभने यंदाही राखली आहे. त्यामुळे दिवाळीत फराळाबरोबर भेट म्हणून दिवाळी अंक देण्याचा ट्रेंड लोकप्रिय असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news