Indrayani River | नदीत बुडालेल्या एकाचा मृतदेह सापडला
देहूगाव : देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत तळवडे या ठिकाणी इंद्रायणी नदीत बुडालेल्या आणखी एकाचा मृतदेह सापडला आहे. काळूराम बबन तांबे (वय ३५, रा. शेलारवाडी) आणि मंगेश तुकाराम उत्तेकर (वय ३१, रा. तळवडे चौक) हे दोघे इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेले होते.
या वेळी पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. ही घटना सोमवारी (दि. ३०) सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. इंद्रायणी नदीत दोन जण बुडाल्याची माहिती देहूरोड पोलिसांना मिळाली होती.
त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्वरित अग्निशमन दल व एका खासगी आपत्कालीन संस्थेस पाचारण केले. काही वेळातच काळूराम तांबे यांचा मृतदेह सापडला होता.
तर, मंगेश उत्तेकर यांचा सुरू होता. अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले.
इंद्रायणी नदीकाठी तरुणाची दुचाकी आणि कपडे देहूरोड पोलिसांना मिळून आले आहेत. मंगळवारी ड्रोनच्या मदतीने मंगेश उत्तेकर यांचा मृतदेह सापडला.

