पुणे: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात राज्यासह परराज्यांतून येणारी फळभाज्यांची आवक वाढली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत दहा ट्रकने शेतमालाची आवक वाढली. त्याला खरेदीदारांकडून मागणीही चांगली राहिली.
आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे टोमॅटो, कोबी, ढोबळी मिरची, शेवगा आणि मटारच्या भावात १० ते २० टक्के बाद झाली आहे. रताळी, भुईमूग शेंग आणि बटाट्याला नकरात्र सुरू असल्यामुळे जास्त मागणी आहे, तरीही मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे यासह उर्वरित सर्व भाज्यांचे भाव मागील आठवडयाच्या तुलनेत स्थिर आहेत.
येथील बाजारात रविवारी (दि. ०६) सुमारे ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, गुजरात आणि आंध्रप्रदेश येथून हिरवी मिरची ७ ते ८ टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी ४ ते ५ टेम्पो, कर्नाटक येथून पावटा ३ ते ४ टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून शेवगा २ ते ३ टेम्पो,
इंदौर येथून ७ ते ८ टेम्पो गाजर, कर्नाटक आणि गुजरात येथून घेवडा ३ ते ४ टेम्पो, कर्नाटक, मुजरात येथून ५ ते ६ टेम्पो भुईमूग शेंग, मध्यप्रदेश येथून लसूण सुमारे ७ ते ८ टेम्पो इतकी आवक झाली. स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ४०० ते ५०० गोणी, चेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ५ ६ टेम्पो, टीमॅटो साडेपाच ते सहा हजार पेटी,
हिरवी मिरची २ ते ३ टेम्पो, काकडी ८ १० टेम्पो, फ्लॉवर ८ ते ९० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, सिमला मिरची ७ ते ८ टेम्पी, भुईमूग शेंग ५० ते ६० गोणी, मटार पुरंदर, पारनेर, वाई आणि सातारा परिसरातून ५० ते ६० गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा जुना ७० ते ७५ आणि नवीन २० ते २५ ट्रक, इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ५५ ते ६० टेम्पो आवक झाल्याची माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.