Pimpri Chinchwad Crime: ताथवडे बाल लैंगिक अत्याचार प्रकरण; संशयिताला ७ दिवसांची पोलिस कोठडी, तपासासाठी एसआयटी स्थापन

आ. रोहित पवारांची वाकड पोलिस ठाण्यात भेट; आरोपपत्र लवकर दाखल करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालविण्याची मागणी
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

पिंपरी: ताथवडे येथील १० वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ६५ वर्षीय संशयिताला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी (दि. २८) सायंकाळी वाकड पोलिस ठाण्याला भेट देऊन या प्रकरणाचा आढावा घेतला. तपास तातडीने पूर्ण करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करावे आणि हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, अशी मागणी त्यांनी केली.

Arrested
Pimpri Chinchwad Minor Riders Action: अल्पवयीनांच्या हातात दुचाकी देणे पालकांना पडणार महागात; पिंपरी-चिंचवडमध्ये ६ महिन्यांत ८६ कारवाया

रमजान बन्नूसाब बागवान (६५, रा. ताथवडे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या दहा वर्षीय मुलीला चाकूने पोट चिरेल, अशी धमकी देत घरात कोणी नसताना संशयिताने स्वतःच्या घरात नेले. त्यानंतर मे २०२६ ते २७ जून २०२६ या कालावधीत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच फिर्यादीच्या चार वर्षीय मुलीला देखील एका प्रसंगी तोंड दाबून घरात नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार एका महिलेच्या निदर्शनास आल्यानंतर तिने पीडितेच्या आईला माहिती दिली. त्यानंतर सोमवारी वाकड पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी ुनावली आहे.

Arrested
PCMC Harassment Case: महिला छळ प्रकरणी वायसीएमच्या प्राध्यापकावर कारवाई; महापालिका कर्मचाऱ्याच्या निलंबनाचा ठराव मंजूर

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी सायंकाळी वाकड पोलिस ठाण्याला भेट देऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून तपासाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी पीडितेला लवकर न्याय मिळावा, यासाठी तपास तातडीने पूर्ण करून शक्य तितक्या लवकर आरोपपत्र न्यायालयात दाखल करावे, अशी सूचना केली. तसेच हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची मागणी केली. रोहित पवार यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. पीडित मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारीही त्यांनी व्यक्त केली. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते सुनील माने यांनी दिली. यावेळी रविकांत वरपे, सुनील गव्हाणे, माजी आमदार सुनील भुसारा, विशाल वाकडकर, साकी कांबळे आदी उपस्थित होते.

Arrested
PCMC Sports Department: क्रीडानगरीतच खेळाचा बाजार? पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागावर नगरसेवकांचे ताशेरे

शरद पवार कधीही भाजपबरोबर जाणार नाहीत

'जेष्ठ नेते शरद पवार हे ६५ वर्षे भाजप विचाराच्या विरोधात काम करीत आहेत. एवढ्या महत्वाच्या टप्प्यात ते भाजप, राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर (एनडीए) जाण्याची भूमिका घेतील, असे लोकांच्या मनात येत असेल तर चुकीचे आहे. त्यांनी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी विचार पुढे नेला आहे. काहीही झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष आणि शरद पवार कधीही भाजप, एनडीएबरोबर जाणार नाहीत', असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.

Arrested
PCMC Rakshak Chowk Flyover Damage: रक्षक चौक उड्डाणपुलाची दोन महिन्यांतच दुरवस्था; पहिल्याच पावसात खड्ड्यांनी उघड केली कामाची पोलखोल

तपास वेगाने करण्यासाठी'एसआयटी'ची स्थापना

ताथवडेतील १० वर्षीय मुलीवरील अत्याचारप्रकरणाचा तपास अधिक वेगाने करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. या पथकात पाच अधिकारी आणि पाच कर्मचाऱ्यांचा समावेश असून, सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) सुनील कुऱ्हाडे यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपविली आहे. विशेष तपास पथकाच्या माध्यमातून गुन्ह्यातील सर्व पुरावे, साक्षी आणि तांत्रिक बाबींची सखोल पडताळणी करून तपास कमी कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरात लवकर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर हालचाली सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून पीडितेला लवकर न्याय मिळवून देण्यासाठी यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news