

तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे परिसरात पारंपरिक बैलपोळा सण उत्साहात साजरा झालेला होता. सकाळपासून बळीराजा जनावरांना नदीवर, ओढ्यावर किंवा जिथे पाण्याचा डोह होता तिथे नेऊन त्यांना धुवून आंघोळ घातली. नंतर त्यांचे अंगावर रंगीत झुलबाशिंग लावलेले होते, शिंगांना लाल, पिवळे, निळे आणि हिरवे बेगिड लावलेले होते. (Latest Pimpari chinchwad News)
गळ्यामध्ये घुंगुर माळा घालून त्यांची सजावट केलेली होती. जसजसे सायंकाळ जवळ आले तसतसे बैलांना गावच्या वेशीजवळ आणलेले होते.
यानंतर पारंपरिक वाद्य वाजवून मिरवणूक काढलेली होती. बैलांच्या अंगावर भंडाऱ्याची उधळण केलेली होती. मावळात, तळेगाव दाभाडे परिसरात बैलांच्या गळ्यातील नारळ मिळवण्यासाठी मोठमोठ्या बक्षिसांसाठी खेळ आयोजित केलेला होता आणि अनेक जण धाडस करत होते.
यावेळी टाळ्या आणि शिट्टयांचा आवाज परिसरात दणाणून गेलेला होता. बैलांना गोडधोड तसेच हिरवा चारा खाऊ घालून सहकुटुंब पूजा केलेली होती. बैलपोळा असल्यामुळे त्यांना कामाला जुंपलेले नव्हते. या सणामुळे परिसरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण पसरलेले होते.