Sunetra Pawar: मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई होणार; सुनेत्रा पवारांनी दिले मृतांच्या कुटुंबीयांना आश्वासन

दुर्घटनास्थळी भेट देत बचावकार्याचा घेतला आढावा; चौकशीत तथ्य समोर आल्यानंतर जबाबदारी निश्चित करण्याची ग्वाही
Sunetra Pawar Moshi Accident
Sunetra Pawar Moshi AccidentPudhari
Published on
Updated on

पिंपरी: मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांची शनिवारी (दि. ११) उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या दुर्घटनेतील दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल, तसेच चौकशीत जे काही तथ्य समोर येईल, त्यानुसार संबंधितांची जबाबदारी निश्चित केली जाईल, असे आश्वासन त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना दिले.

Sunetra Pawar Moshi Accident
Moshi Garbage Depot Illegal Construction: मोशी कचरा डेपोतील प्रशासकीय इमारतच अनधिकृत?; तळमजल्याची परवानगी, मात्र उभारले दोन मजले

मोशी येथील दुर्घटनास्थळी भेट देऊन सुनेत्रा पवार यांनी बचावकार्याचा आढावा घेतला. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, ज्येष्ठ नेते नाना काटे, अजित गव्हाणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Sunetra Pawar Moshi Accident
Moshi Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेत आठ कामगारांचा मृत्यू; चार दिवसांच्या बचाव मोहिमेनंतर आशा मावळल्या

या वेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, दुर्घटनास्थळी बचावकार्यात अनेक तांत्रिक अडचणी होत्या. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मिथेनसह विषारी वायूचा धोका आणि सततचा पाऊस यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे काम अधिक काळजीपूर्वक करावे लागले. आपल्या माणसांना वाचविण्याची नातेवाईकांची धडपड आणि बचावकार्य अधिक वेगाने व्हावे, अशी त्यांची अपेक्षा स्वाभाविक असल्याचेही त्यांनी सांगितले.

Sunetra Pawar Moshi Accident
Hinjewadi Shivajinagar Metro Delay: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोला पुन्हा विलंब; १५ जुलैचा मुहूर्त हुकण्याची शक्यता

घटनेच्या पहिल्या दिवसापासून प्रशासन, अधिकारी आणि बचाव यंत्रणांच्या सातत्याने संपर्कात होते. लष्कर आणि एनडीआरएफची मदत तातडीने घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बचावकार्याचा नियमित आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले. दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाईबाबत त्या म्हणाल्या, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. चौकशीत जे काही तथ्य समोर येईल, त्यानुसार जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Sunetra Pawar Moshi Accident
YCM Hospital Wall Collapse Risk: वायसीएम रुग्णालयाची संरक्षक भिंत धोकादायक; वर्दळीच्या रस्त्यावर अपघाताची टांगती तलवार

मोशी कचरा डेपोमध्ये अनेक वर्षांपासून साचलेल्या लेगेसी वेस्टच्या प्रश्नाबाबतही त्यांनी भूमिका मांडली. सध्या बचावकार्य पूर्ण करणे हेच सर्वात महत्त्वाचे असून, त्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतला जाईल. यापूर्वीही या विषयावर सूचना देण्यात आल्या होत्या. आता महापालिका, संबंधित विभाग आणि कंत्राटदार कंपनीसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल. तसेच दुर्घटनाग्रस्त कुटुंबांच्या मागण्यांचाही सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन सुनेत्रा पवार यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news