Apar ID card| विद्यार्थ्यांना मिळणार अपार ओळखपत्र

केंद्र शासनाकडून राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करून घेण्याबाबत कळविले आहे.
Apar Identycard
Apar Id card File Photo
Published on
Updated on

पिंपरी : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी अपार (अॅटोमेटेड पर्मनंट अॅकेडमिक रेजिस्ट्री) ओळखपत्र काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शहरातील महापालिका शाळांमध्ये नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाकडून राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करून घेण्याबाबत कळविले आहे. येत्या महिनाभराच्या कालावधीत प्रथम प्राधान्याने राज्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

या आयडीमुळे विद्यार्थ्यांना एक १२ अंकी विशेष क्रमांक मिळणार आहे. अपार आयडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची माहिती डिजिटल स्वरुपात साठविण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या आहेत.

अंमलबजावणी कशी होणार ?

अपार आयडी तयार करण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेसाठी राज्य पातळीवर राज्य प्रकल्प संचालक (समग्र शिक्षा) हे नोडल ऑफिसर असणार आहेत. हे आयडी तयार करण्यासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर संगणक समन्वयकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घ्यायचे आहेत. महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बाबर याबाबत अधिक माहिती देताना म्हणाल्या, विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्यासाठी सर्वप्रथम मुख्याध्यापक किंवा शिक्षकांचे डिजिटल ट्रेनिंग घेतले जाणार आहे. गरज भासल्यास ऑफलाईन ट्रेनिंग देण्याबाबतही विचार केला जाईल. शहरातील खासगी माध्यमिक शाळांना माध्यमिक शिक्षण विभागातर्फे पत्राद्वारे विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्याबाबत कळविण्यात येणार आहे.

'अपार' आयडीमुळे होणारे फायदे

  • विद्यार्थ्यांना दिला जाणारा १२ अंकी यूपीआय आयडी हा युनिक असणार आहे.

  • हा अपार आयडी विद्यार्थ्यांचे संपूर्ण शालेय शिक्षण होईपर्यंत सुरू राहणार आहे.

  • यू डायस प्रणालीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे आधार वैध झाले आहे, त्यांचेच अपार आयडी तयार होतील.

  • अपारमुळे विद्यार्थ्यांना मिळणार्या सुविधा, प्रगती अहवाल, शाळाबाह्य मुलांचा मागोवा घेणे, गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत करणे आदी बाबी नियंत्रित करता येणार आहे.

  • अपार आयडी तयार झाल्यानंतर तो डीजी लॉकरला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये साध्य केलेले लक्ष्य, इयत्ता दहावी, बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल ऑनलाईन पद्धतीने बघता येणार आहे.

  • अपार आयडीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतुन दुसऱ्या शाळेत, इतर जिल्हा व राज्यात ऑनलाईन पद्धतीने पाठविणे सुलभ होणार आहे.

  • राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आयडी विद्या समीक्षा केंद्रामध्ये जोडण्यात येणार आहे. त्या माहितीवर ग्राफिकल अॅनलिसिस करण्यात येईल.

अपार आयडीबाबत राज्य प्रकल्प संचालकांकडून पत्राद्वारे मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. केंद्र सरकारकडून मात्र अद्याप मार्गदर्शक सूचना नाहीत. तथापि, महापालिका शाळांतील नववी आणि दहावीतील वर्गासाठी प्राथमिक तत्त्वावर अपार आयडी तयार करण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे.

संगीता बाबर, प्रशासन अधिकारी, महापालिका शिक्षण विभाग.

Here are the meta keywords in English for the given Marathi headline:

- National Education Policy

- NEP implementation

- APAR ID for students

- Automated Permanent Academic Registry

- Central government initiative

- APAR identification system

- Municipal school students

- APAR ID for class 9 and 10

- Education reforms India

- Student registry program

- NEP student tracking system

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news