पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर, ओझर्डे गावाजवळ रविवारी (दि. 19) सकाळी साडेआठच्या सुमारास एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला भीषण आग लागली. ही घटना, बस पुण्याहून मुंबईकडे जात असताना उर्से टोलनाक्यापासून पुढे जाताच काही अंतरावर घडली.
बसमध्ये 12 प्रवासी होते. चालकाने आग वेळीच ओळखून बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही वेळातच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
घटनेमुळे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. आयआरबी कंपनीच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चालकाच्या प्रसंगावधानामुळे 12 प्रवासी सुखरूप खाली उतरले. अपघातामुळे वाहतूक कोंडी; आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची मदत.