

Pune Aerospace Startup SiriNor Who is Abhijeet Inamdar
पुणेः पुणे शहरातील पिंपरी मधील सिरीनॉर या एरोस्पेस उत्पादने बनविण्याऱ्या स्टार्टअप कंपनीने जगातील पहिले असे इलेक्ट्रीक जेट इंजिन तयार केले आहे जे कोणत्याही प्रकारचे प्रदूषित वायुचे उत्सर्जन करीत नाही. या इंजिनची प्राथमिक चाचणी पूर्ण झाली असून ते 2026 पर्यंत जगाच्या बाजारात येण्याची शक्यता आहे.
सिरीनॉर कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ अभिजीत इनामदार यांनी हा दावा केला आहे.त्यांनी सांगितले की,या इंजिनच्या प्राथमिक चाचण्या पुणे शहरातील पिंपरी भागातील कंपनीच्या कार्यालयात झाल्या आहेत.कोणत्याही वायुचे उत्सर्जन न करणारे हे जगातिल पहिले जेट विमानाचे इंजिन ठरले आहे.भारत आणि नॉर्वे देशात या कंपनीची कार्यालये आहेत.
जिवाश्म इंधनासह इतर प्रकारच्या इंधनातून जसे हरितगृह वायू जेट विमानातून आकाशात निघताना दिसतात.तसे प्रदुषित वायू या इंजिन मधून निघणार नाहीत असा दावा संशोधकांनी केला आहे.या प्रकारच्या संशोधनात पुणे शहराने आघाडी घेत हे नवे संशोधन जगाला दिले आहे.
सन 2026 च्या मध्यापर्यंत यूएव्ही इंजिनचे व्यावसायिकीकरण
त्यानंतर 2027 पर्यंत सीप्लेन इंजिन प्रमाणन आणि 2030 पर्यंत प्रादेशिक विमानांसाठीचे इंजिन तयार करणे
पुढील पाच वर्षांत कंपनी 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्याच्या जागतिक जेट इंजिन बाजारात प्रवेश करण्यासाठी स्वतःला तयार करत आहे.
पुणे, बंगळुरू, कोइम्बतूर आणि हैदराबाद येथे धोरणात्मक उत्पादन पुरवठा साखळीसाठी तयारी केली जात आहे.
या इंजिन प्रोटोटाइपने 40 हजार आरपीएम पेक्षा जास्त वेग वाढवून 10 किलोफूट थ्रस्ट निर्माण करून त्याच्या डिझाइन वैशिष्ट्यांपेक्षा जास्त कामगिरी केली.
नियंत्रित वातावरणाच्या प्रयोगशाळेत हे संशोधन केले आहे.ते स्केलेबल आर्किटेक्चरसह हे इंजिन यूएव्ही, प्रादेशिक विमाने, सीप्लेन आणि संरक्षण प्लॅटफॉर्ममध्ये विस्तृत प्रयोगांसाठी डिझाइन केले आहे.
इलेक्ट्रिक इंजिनमध्ये उर्जा-स्रोताची भूमिका नसते. ते ज्वलन कमी करतात
उत्पादन खर्च 30% तर देखभाल खर्च 40% पर्यंत कमी.
हरितगृह वायूचे शुन्य उर्त्सर्जन
मेन्टेनन्स मध्ये 15 ते 25 टक्के बचत
इंजिन चे वजन 20 ते 30 टक्यांनी कमी
आवाज 140 वरुन केवळ 80 सेसिबेल्स इतका कमी
गती मध्ये 20 टक्के प्रगती
आम्ही अशा प्रकारचे संपूर्ण जेट इंजिनच विकसित करीत आहोत.पेटंटची प्रक्रिया देखील पूर्णत्वाकडे आहे.अमेरिकेतील नासा या अंतराळसंस्थेने दिलेल्या परिमाणानुसार (टीआरएल 6) या प्रणालीच्या इंजिनला मान्यता मिळाली आहे. ज्याचे व्यायसायिकरण करणे शक्य झाले आहे. त्यामुळे हे जेट इंजिनच्या युगात क्रांतीक्रारी संशोधन आहे.सिरीनॉर ने जे जेट इंजिनचे प्रोटोटाईप तयार केले आहे. त्याचे आरपीएम 40 हजार इतकी आहे.
अभिजित इनामदार,सीईओ,सिरिनॉर,पुणे
अभिजित इनामदार हे मूळचे सोलापूरचे असून अभियांत्रिकी शिक्षणानंतर ते अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेले.त्यांनी तेथील अलास्का विद्यापीठातून पेट्रोलियम अभियांत्रीकीचे शिक्षण घेतले.त्यांनी पुणे आणि नॉर्वे देशातील तज्ञांशी भागिदारी करीत या कंपनीची उभारणी केली असून ते कंपनीचे सहसंस्थापक आहेत.