pcmc News
द्वारयात्रेस शुक्रवारपासून प्रारंभPudhari

Chinchwad: श्री मोरया गोसावी महाराज द्वारयात्रेस शुक्रवारपासून प्रारंभ

समाधी मंदिरातून चार दिवसांच्या द्वारयात्रा कालावधीत दररोज सकाळी नऊ वाजता प्रारंभ होतो
Published on

पिंपरी : चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या द्वारयात्रेला 25 जुलैपासून प्रारंभ होणार आहे. श्रावण शुद्ध प्रतिपदेपासून ते चतुर्थीपर्यंत, म्हणजे चार दिवस चालणार्‍या या धार्मिक यात्रेबाबतची माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज यांनी दिली. (Pcmc latest News)

द्वारयात्रेची परंपरा अनेक दशकांपासून चालू असून, श्री मोरया गोसावी महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरातून चार दिवसांच्या द्वारयात्रा कालावधीत दररोज सकाळी नऊ वाजता प्रारंभ होतो. यात्रेच्या सुरुवातीला श्री चिंतामणी महाराज यांच्या समाधी स्थळी धूपारती, नंतर भाविकांच्या उपस्थितीत वाजत- गाजत यात्रा श्री मंगलमूर्ती वाड्यातून मार्गस्थ होते.

यात्रेदरम्यान चारही दिशांना असलेल्या द्वारदेवींच्या मंदिरांना भेट दिली जाते. प्रत्येक ठिकाणी पूजन, गोंधळ, जोगवा व स्तोत्रांचे पठण होते. ध्यात्मिक वातावरणात श्रद्धेने न्हालेल्या भाविकांचा सहभाग लक्षणीय असतो. दररोज यात्रा सांगतेनंतर देवस्थान ट्रस्टतर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात येते.

pcmc News
PMRDA draft DP: पीएमआरडीएकडून नव्या डीपीबाबत हालचाली

नागरिकांनी श्री मोरया गोसावी महाराज द्वारयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आले आहे. यात्रेच्या आयोजनासाठी सुरक्षा, वाहतूक व सुविधा यांची पूर्ण तयारी करण्यात आल्याची माहिती मंदार देव महाराज यांनी दिली.

द्वारयात्रेचा कार्यक्रम खालीलप्रमाणे :

  • शुक्रवार (दि.25) - पूर्वद्वार : एम्पायर इस्टेट सोसायटी, चिंचवड स्टेशन येथील श्री मांजराई देवी मंदिर

  • शनिवार (दि. 26) - दक्षिणद्वार : वाकड येथील श्री आसराई देवी मंदिर

  • रविवार (दि. 27) - पश्चिमद्वार : रावेत येथील श्री ओझराई देवी मंदिर

  • सोमवार (दि. 28) - उत्तरद्वार : आकुर्डी येथील श्री मुक्ताई देवी मंदिर व श्री खंडोबा मंदिर

  • ही परंपरा केवळ एक धार्मिक विधी नसून, शहराच्या आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे. प्रत्येक वर्षी यात्रेत नागरिकांचा वाढता सहभाग ही श्रद्धेची साक्ष आहे.

  • - मंदार देव महाराज (मुख्य विश्वस्त, चिंचवड देवस्थान ट्रस्ट)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news